रिपोर्टर सुहास कराडकर
सांगली/कडेगांव न्युज: कडेगाव नगरपंचायतीची स्थापना २०१६ साली झाली असून ०८ वर्षे पूर्ण झाली असून अद्याप नगरपंचायतीला अग्निशामक वाहन उपलब्ध नव्हते त्यामुळे शहरांमध्ये तात्काळ कुठे आग लागली तर अग्निशामक वाहन विटा, कराड, अथवा आसपासच्या साखर कारखान्याची अग्निशामक यंत्रणा बोलवावी लागत होती. माजी आमदार पृथ्वीराज देशमुख व संग्रामसिंह देशमुख यांच्या सहकार्याने कडेगाव शहराला अग्निशामक वाहन उपलब्ध व्हावे यासाठी पाठपुरावा केला होता. त्या पाठपुराव्याला यश आले असून नगरपंचायतीला हक्काची अग्निशामक गाडी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांची गैरसोयीपासून सुटका होऊन, तात्काळ कुठे आग लागल्यास तात्काळ ती आग विझवण्यासाठी अग्निशामक वाहनाचा उपयोग होणार असल्याची माहिती कडेगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष धनंजय देशमुख यांनी दिली, ते कडेगाव नगरपंचायतीच्या अग्निशामक वाहनाच्या लोकार्पण सोहळ्यावेळी बोलत होते यावेळी कडेगावचे उपनगराध्यक्ष पै. अमोल डांगे, सार्वजनिक बांधकाम सभापती निलेश लंगडे, मुख्याधिकारीपवन म्हेत्रे प्रमुख उपस्थित होते.
यावेळी बोलताना कडेगाव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी पवन म्हेत्रे म्हणाले की शहरात तात्काळ कुठे आग लागण्याची दुर्घटना घडल्यास ती तात्काळ विजवण्यासाठी या अग्निशामक वाहनाचा वापर केला जाणारा असून लवकरच २४ तास उपलब्ध असणारा संपर्क क्रमांक प्रकाशित केला जाणार आहे. नागरिकांनी शहरात कुठे आग लागण्याची दुर्घटना घडल्यास नागरिकांनी नगरपंचायतीशी तात्काळ संपर्क साधण्याचे आव्हान मुख्याधिकारी पवन म्हेत्रे यांनी केले.
यावेळी महिला व बालकल्याण सभापती रंजना लोखंडे, आरोग्य स्वच्छता सभापती विजय गायकवाड, महिला व बालकल्याण उपसभापती मनीषा राजपूत, नगरसेविका शुभदा देशमुख, नाजनीन पटेल, दीपा चव्हाण,विद्या खाडे, नजमाबी पठाण, नगरसेवक संदीप गायकवाड,माजी नगरसेवक उदयकुमार देशमुख,विजय खाडे, मुख्तार पटेल किशोर मिसाळ, संभाजी देसाई, श्रीजय देशमुख, युवराज राजपूत, शिवलिंग सोनवणे, मनोज भस्मे, सौरभ पवार, पत्रकार हिराजी देशमुख, पत्रकार परवेझ तांबोळी यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ सर्व नगरसेवक नगरसेविका सभापती कर्मचारी वर्ग उपस्थित होते.