रिपोर्ट: अतुल काळे
सांगली/ तासगाव : शेतकरी बांधवांनो बेदाणा विक्रीस गडबड करू नका आपला बेदाणा शेडवर देऊ नका. द्राक्ष आणि बेदाणा मालाला यंदा चांगला भाव मिळणार आहे. चुकीच्या व्यापारांना बेदाणा विक्री करू नका असे आवाहन शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी केले आहे.
ते पुढे म्हणाले, यंदा चार किलो द्राक्षाच्या रेटला 200 ते 250 रुपये भाव मिळत आहे. तसेच बेदाण्याला 150 ते 250 रुपये इतका दर सध्या सुरू आहे. गेल्या तीन वर्षात शेतकरी बांधवाच्या द्राक्ष आणि बेदाण्यास योग्य भाव मिळाला नाही. त्यामुळे तो आर्थिक अडचणीत आला आहे. दरवर्षी दोन लाख टन उत्पन्न घेतले जाते. परंतु यावर्षी दीड लाख टनच उत्पन्न होईल असा अंदाज आहे. त्यामुळे बाजारपेठेत 50 हजार टन माल कमी पडणार आहे. त्यामुळे आपला बेदाणा विक्रीस गडबड न करता धीर धरावा. संयम ठेवावा. यावर्षी बेदाण्याला दर चांगला मिळेल, असे आवाहन श्री खराडे यांनी बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांना केले आहे.