प्रतिनिधी -अतुल काळे
- वसंतरावदादा पाटील महाविद्यालयात नशामुक्ती जनजागृती
सांगली/तासगाव : विद्यार्थ्यांनी चांगल्या मित्राची संगत धरून अमली पदार्थ पासून दूर राहावे असे उद्गार प्रा.आण्णासाहेब बागल यांनी पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील महाविद्यालय तासगाव येथे नशामुक्ती अभियानाअंतर्गत अमली पदार्थाचे दुष्परिणाम या विषयावर मार्गदर्शन करताना काढले. जिल्हाधिकाऱ्यांनी NCORD समितीच्या बैठकीतील सूचनेनुसार महाविद्यालयात प्राचार्य डॉ.मिलिंद हुजरे यांच्या मार्गदर्शनाखाली नशामुक्ती अभियान राबविले. विद्यार्थी महाविद्यालयात प्रवेश करतानाच त्यांच्या दप्तराची तपासणी केली. कार्यक्रमात बोलताना प्रा.बागल यांनी विद्यार्थ्यांना व्यसन,व्यसनाचे प्रकार व व्यसनाचे दुष्परिणाम सांगून जनजागृती केली.१३ते १९ या वादळी वयाच्या कालखंडात विद्यार्थ्यांनी स्वतःला जपावे. अंमली पदार्थांपासून दूर राहावे,नियमित व्यायाम करावा,पौष्टिक आहार घ्यावा व पुरेशी झोप घ्यावी.व्यसन करणाऱ्या व्यक्तीपासून दूर रहावे.मोबाईल पासून दूर राहून चांगला अभ्यास करून आई वडीलांसह महाविद्यालयाचा नावलौकीक वाढविण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले.यासाठी गटशिक्षणाधिकारी आबासाहेब लावंड यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कु.स्वामिनी बुधावले व कु.आदिती पंडीत यांनी आपल्या मनोगतातून अंमली पदार्थांचे दुष्परिणाम सांगितले.
कार्यक्रमाला प्रा.एस.एन.पाटील, प्रा.एस.व्ही.माळी, प्रा.डी.एच.पाटील, प्रा.आर.के.नलवडे यांसह महाविद्यालयातील प्राध्यापक विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.