स्व. आर. आर. आबांच्या पुण्यतिथी निमित्ताने तासगाव अनोखे भव्य प्रदर्शन

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

प्रतिनिधी – अतुल काळे

  • आर आर पाटील ज्ञानप्रबोधिनी कडून आयोजन

सांगली /तासगाव : उपमुख्यमंत्री व गृहमंत्री स्वर्गीय आर आर आबा पाटील यांच्या स्मृती दिनानिमित्त आर आर पाटील ज्ञान प्रबोधिनी तासगाव या संस्थेच्या वतीने दुर्मिळ वृत्तपत्रे आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित श्री गजानन पटवर्धन यांनी संग्रहित केलेली विविध देशातील दुर्मिळ टपाल तिकिटे व ख्यातनाम व्यक्तींच्या स्वाक्षऱ्यांचे अनोखे भव्य प्रदर्शन आयोजित केले आहे. श्री विठ्ठल मंदिर शिंपी गल्ली तासगाव येथे शुक्रवार दि. 14 व शनिवार दि.15 फेब्रुवारी 25 असे दोन दिवस सदरचे प्रदर्शन सकाळी दहा ते सायंकाळी सात वाजेपर्यंत भरणार आहे.
सदर प्रदर्शनाचे उद्‌घाटन शुक्रवार दिनांक 14 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजता युवा नेते आमदार श्री रोहित दादा आर आर पाटील यांचे शुभहस्ते होणार आहे तर शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता वारकरी शिक्षण संस्था करोली टी तालुका कवठेमहांकाळ या संस्थेच्या विद्यार्थ्यांचे अभंग गायन होणार असून एकाच वेळी सुमारे 25 वारकरी संप्रदायाचे विद्यार्थी मृदंग वादन करीत हरिनामाचा गजर करणार आहेत. तासगाव नागरिक विद्यार्थी यांना ही एक पर्वणी असणार आहे तरी तासगाव शहरातील तसेच आजूबाजूचे नागरिक, विद्यार्थ्यांनी सदर प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन आर आर पाटील ज्ञान प्रबोधिनीच्या अध्यक्षा उल्काताई माने व कार्यवाह सुभाष कुलकर्णी यांनी केले आहे.

Leave a Comment

और पढ़ें