समृद्धीची फायबर कंपोझीट सळई आर्थिक बचत करेल : रमाकांत मालू

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

प्रतिनिधी – अतुल काळे

  • बांधकाम क्षेत्रात समृद्धीचे नवे पाऊल
  • लोखंडी सळईला पर्याय उपलब्ध : आर्थिक बचतही होणार

सांगली/तासगाव : अन ब्रेकेबल प्लास्टिकच्या माध्यमातून समृद्धी समूहाने यापूर्वी प्लास्टिकचे अडीचशे पेक्षा जास्त उत्पादने बाजारपेठेत उपलब्ध करत भारतीय बाजारपेठेवर अधिराज्य गाजवले आहे. आता समृद्धी उद्योग समूह सन २०२४ पासून बांधकाम क्षेत्रात पदार्पण करीत लोखंडी सळईला पर्याय उपलब्ध करून देत फायबर कंपोझीट सळईचे उत्पादन सुरू केल्याने लोखंडी सळीच्या तुलनेत ग्राहकांची २० ते ५० टक्के आर्थिक बचत करेल असे प्रतिपादन समृद्धी इंडस्ट्रीजचे मॅनेजिंग डायरेक्टर रमाकांत मालु यांनी केले. समृद्धी मल्टीपर्पज हॉल तासगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पुढे बोलताना मालू म्हणाले, समृद्धीने प्लास्टिक फायबर सळईच्या मजबुतीची पूर्णपणे हमी दिल्याने ग्राहकाकडून निसंकोचपणे बांधकाम क्षेत्रात अर्थातच, गोदामे, कारखाने शेड, शीतगृहे, बस स्थानके, विमानतळ शेड अशा विविध ठिकाणी फायबर कंपोझीट सळईचे उत्पादनांचा वापर होणार आहे. पारंपारिक लोखंडी सळईला फाटा देत बांधकाम क्षेत्रात फायबर कंपोझीट सळईचा वापर सुरू झाला आहे. अशी सळई ‘समृद्धी’ने बाजारात आणल्याने वापरकर्त्यांना सोपस्कर झाले आहे.

वजनाने हलकी, वापरण्यासाठी सोपी व गंजरोधक, लोखंडी सळईच्या तुलनेत वीस ते पन्नास टक्के स्वस्त आहे. त्यांचा उपयोग आता रस्ते, इमारतीकरिता होत आहे. तसेच, समृद्धी उद्योगसमूहाने प्री-इंजिनिअरिंग बिल्डिंग क्षेत्रात झेप घेतल्याने देशभरातील ग्राहकांना बांधकाम क्षेत्रातही मजबूतीची विश्वासहर्ता निर्माण झाली आहे. आय.एस.आय. मानांकन प्राप्त तसेच, इंडियन रोड काँग्रेस या शासकीय संस्था मार्फत बांधकाम क्षेत्रासह विविध ठिकाणी वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे.
समृद्धी कंपोझिटचे अमीर पटेल यांनी समृद्धी फायबर कंपोझिट उत्पादनाचे महत्त्व पटवून दिले. तर सांगली जिल्ह्याचे डिस्ट्रीब्यूटर राजश्री ट्रेडिंग कंपनी तासगावचे अभिजीत पवार यांनी समृद्धीने दिलेले उत्पादन शेतकऱ्यांच्या बांधापासून व मोठ – मोठ्या बिल्डिंग पर्यंत पोहचविण्यासाठी आवश्यक त्या उपायोजना राबवू असे सांगितले. यावेळी इंजिनीयर अनिल जाधव, राजेश यादव, सुनिल निपाणीकर, संजय नाईक, आनंदबाबू औताडे, जावेद मुल्ला, सुरेश कणसे, सुनिल माळी, सुरेश सुर्यवंशी, श्रीकांत कुंभार, युवराज लुगडे, अश्विन कोकणे, निशांत शिंदे, शितल स्टील चे संचालक अमोल माळी तसेच, तासगाव शहर व परिसरातील सर्व इंजिनियर, कॉन्ट्रॅक्टर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

और पढ़ें