प्रतिनिधी- अतुल काळे
सांगली/ तासगाव : जायंट्स ग्रुप ऑफ अस्मिता सहेली तासगाव चा शपथविधी व पदग्रहण सोहळा मोठ्या उत्साहात, खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला. प्रेरणा महिला मंडळ हॉल तासगाव येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात फेडरेशन अध्यक्ष माननीय श्री प्रशांत माळी यांनी अस्मिता सहेलीच्या नूतन अध्यक्षा सौ अर्चना जोग तसेच कार्यकारिणी सदस्या, नूतन सदस्यांना शपथ दिली.
शपथविधी व पदग्रहण सोहळा प्रोटोकॉल प्रमाणे सुरुवात झाली. या समारंभास .. केंद्रीय समिती सदस्य ( जा. वे. फौ .) मान.ॲड विलासरावजी पवार,फेडरेशन २ क चे अध्यक्ष मान.श्री. प्रशांत माळी, उपाध्यक्ष अनुजा पाटील को ऑर्डीनेटर जया जोशी, युनिट डायरेक्टर वैशाली कुलकर्णी उपस्थित होते. मावळत्या अध्यक्षा सौ किरण हंचनाळकर यांनी मीटिंग कॉल टू ची ऑर्डर दिली. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रास्ताविक सौ अर्चना कुलकर्णी यांनी केले.
अस्मिता सहेलीच्या नूतन अध्यक्षा अर्चना जोग यांनी आपल्या मनोगतात वर्षभरात कोणते उपक्रम हाती घेणार आणि कशा पद्धतीने काम करणार याविषयी माहिती दिली. यावेळी जायंट्स ग्रुप ऑफ सहेली तासगावचे पदाधिकारी, कार्यकर्त्या उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ संगीता जोगळेकर यांनी तर आभारप्रदर्शन माधुरी आंबेकर यांनी केले. वंदे मातरम ने कार्यक्रमाची सांगता झाली.