लोक प्रतिनिधी धर्मेंद्र ठाकुर.
नवीं मुम्बई। पावणे गावं, नवी मुंबई वैष्णव देवी मित्र मंडळाच्या वतीने लोक प्रतिनिधी किशोर लोंढे यांचा शाल, पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
पावणे गावं, नवी मुंबई याठिकाणी नवरात्र उत्सव व घटस्थापना उत्साहात साजरा.
श्री. विजय पाटील, शशांक पाटील, साहिल पाटील व सल्लागार दत्तात्रये दिवाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सालाबादप्रमाणे यंदाही नवरात्रोत्सव व घटस्थापना उत्सव पावणे गावं या ठिकाणी उत्साहात साजरा करण्यात येत आहे.
मंडळातील सर्व पदाधिकारी याठिकाणी निस्वार्थी मनाने काम करतात. अशी माहिती अध्यक्ष साहिल पाटील, उपाध्यक्ष विशाल पाटील व सचिव कुणाल पाटील यांनी दिली.
सोबत. विजय पाटील, मनोज पाटील, अमित नवगिरे, सचिन नवगिरे, नितीन शिंदे, अमन खर्चे, रितीक घाणेकर, श्रीनाथ नवगिरे.
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शाखाप्रमुख प्रमोद बंडेकर, किशोर राठोड व उप शाखाप्रमुख आकाश इटकर उपस्थित होते.