Search
Close this search box.

विद्यार्थ्यांनी पर्यावरण दूत म्हणून काम करावे – प्राचार्य डॉ.मिलिंद हुजरे

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

प्रतिनिधी – अतुल काळे

  • वसंतरावदादा पाटील महाविद्यालयात हरित कॅम्पस या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा

सांगली/तासगाव : पर्यावरणाच्या समस्या ग्रीन प्रॅक्टिसच्या मदतीने सोडविल्या जाऊ शकतात. विद्यार्थ्यांनी पर्यावरण दूत म्हणून काम करावे असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.मिलिंद हुजरे यांनी केले . पद्मभूषण डॉ.वसंतरावदादा पाटील महाविद्यालय तासगाव येथे ‘ग्रीन कॅम्पस इनिशिएटीव्हज’ या विषयावर आयोजित एक दिवसीय कार्यशाळेत बोलताना काढले. ते पुढे म्हणाले पर्यावरणातील समस्या नक्की कोणत्या आहेत हे आपण समाजाला सांगितले पाहिजे.पर्यावरण संवर्धन मनापासून करण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांचा एक ग्रुप (टास्क फोर्स) तयार करून त्यांच्याकडून आलेल्या नवनवीन कल्पना महाविद्यालयात राबवाव्यात. लोकल प्रॉब्लेम वर फोकस करून पर्यावरण संवर्धनासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
पहिल्या सत्रात साधन व्यक्ती म्हणून लाभलेले महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.नरेंद्र कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना ग्रीन कॅम्पस विषयी मार्गदर्शन केले स्लाईडच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणासाठी आपण कोणते प्रयत्न करू शकतो हे त्यांनी दाखवून दिले.दुसऱ्या सत्रात साधन व्यक्ती म्हणून डॉ.संदिप शिंदे यांनी हरित कॅम्पस मधील हरित उपक्रम या विषयावर विद्यार्थ्यांना ऑनलाइन मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रीन प्रॅक्टिसेस समितीचे समन्वयक प्रा. रोहित लोंढे यांनी केले तर आभार डॉ.दत्ता गुंजाळ यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. आण्णासाहेब बागल यांनी केले. कार्यक्रमाला प्रा.विशाल शेरकर , डॉ.पी.बी.तेली,डॉ.सुनिल गावीत,प्रा.प्रगती जाधव ,प्रा. पुनम पाटील यांसह महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय सेवक वर्ग , विद्यार्थी – विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

और पढ़ें