Search
Close this search box.

माहिती अधिकार हा आपला मूलभूत अधिकार आहे – प्राचार्य डॉ.मिलिंद हुजरे

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

प्रतिनिधी – अतुल काळे

  • वसंतरावदादा पाटील महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन साजरा

सांगली/तासगाव : देशाचा आदर्श नागरिक बनवणे आणि देशाच्या विकासात भर घालण्यासाठी मानवाधिकाराला महत्त्व आहे.माहिती अधिकार हा आपला मूलभूत अधिकार आहे असे प्रतिपादन प्राचार्य मिलिंद हुजरे यांनी केले. पद्मभूषण डॉ.वसंतरावदादा पाटील महाविद्यालय तासगाव येथे आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना ते पुढे म्हणाले, आपल्यावर अन्याय झाला असेल तर आपण माहिती अधिकाराच्या माध्यमातून न्याय मागू शकता.माहिती अधिकार कायदा आपल्याला जीवनात नक्कीच उपयोगी पडेल असे सांगून या कायद्याचा प्रचार आणि प्रसार करण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून समाजशास्त्र विभागाचे प्रमुख कॅप्टन डॉ. विनोदकुमार कुंभार यांनी विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय माहिती अधिकाराचा इतिहास सांगून ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांच्या आंदोलनामुळे आपल्याकडे माहिती अधिकाऱ्याचा कायदा पारित झाल्याचे सांगितले.माहिती अधिकाराचा उद्देश, कायद्याची विशेषता, या कायद्यामुळे नागरिकांना प्राप्त झालेला अधिकार त्यांनी विद्यार्थ्यांना विविध उदाहरणाच्या माध्यमातून समजावून सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.आण्णासाहेब बागल यांनी केले तर आभार विज्ञान विभाग प्रमुख प्रा.पी.डी.पाटील यांनी मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.प्रणया पाटील यांनी केले.कार्यक्रमाला प्रा.एल.एस.जाधव, प्रा.डी.एच.पाटील यांसह महाविद्यालयातील प्राध्यापक विद्यार्थी – विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

और पढ़ें