Search
Close this search box.

तासगावच्या शिवनेरी संघाने  फोडली विश्‍वजितेश फौंडेशनची दहीहंडी

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

प्रतिनिधी – अतुल काळे

कडेगावात रंगला थरार : सिने कलाकारांची उपस्थिती आणि मैदानात गर्दी 

सांगली/कडेगाव : माजी कृषी राज्यमंत्री आ.डॉ.विश्वजित कदम व युवा नेते डॉ.जितेश कदम यांच्या विश्वजितेश फौंडेशनने कडेगाव येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या मैदानात आयोजित केलेली दहीहंडी तासगावच्या शिवनेरी संघाने फोडली. ही दहीहंडी फोडण्याचा मान मिळवत या संघाने ९९ हजार ९९९ रुपयांचे  बक्षिसही पटकावले. आमदार डॉ. विश्वजित कदम यांच्या हस्ते या संघाला बक्षीस आणि सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.
यावेळी आमदार डॉ.विश्वजित कदम, माजी आमदार मोहनराव कदम, सागरेश्वर सूतगिरणीचे अध्यक्ष शांताराम  कदम, युवा नेते डॉ.जितेश कदम, युवा नेते दिग्विजय कदम यांच्यासह सिनेअभिनेत्री मलायका आरोरा व सोनल चौहान आणि प्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम  यांची या दहीहंडी उत्सवास प्रमुख उपस्थित होती.
या दहीहंडी उत्सवात कडेगाव शहरासह तालुक्यातील ग्रामस्थांनी प्रचंड संख्येने हजेरी लावत भरघोस प्रतिसाद दिला. यावेळी मैदान प्रेक्षकांनी खचाखच भरले होते. जयमल्हार विटा, दुर्गामाता शिरोळ या संघांनी या उत्सवात सहभाग घेतला होता.
जयमल्हार विटा आणि शिवनेरी तासगाव मंडळांमध्ये पहिल्यापासूनच चुरस होती. सलामी दिल्यानंतर पाच फुटांनी हंडी खाली घेण्यात आली. अखेर पावणे अकराच्या सुमारास सात थर उभारत शिवनेरी तासगाव या संघाने हंडी फोडत एक जल्लोष स्टेडियमवर केला. यामुळे मोठा उत्साह कडेगावकरांमध्ये दिसून आला. या मंडळाला ९९ हजार९९९ रूपयाचे बक्षिस दिले गेले.
यावेळी सिनेकलाकारांची उपस्थितीत अख्ख्या मैदानावार जल्लोष संचारला होता. लेसर शो, फटाक्यांची आतिषबाजीने आसमंत उजळला होता. अशा जल्लोषी वातावरणात शिवनेरी तासगावच्या संघाच्या जिगरबाज गोविंदांनी सात थरांचा मनोरा उभारत कडेगावकरांची मानाची दहीहंडी फोडली. यावेळी सागर कदम,महेश कदम , युवा नेते हर्षवर्धन कदम,हिंद केसरी पै.संतोष वेताळ,विट्याचे नगरसेवक सुमित गायकवाड यांचेसह मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, ऑलिंपिक कांस्यपदक विजेत्या स्वप्नील कुसाळेचा जाहीर सत्कार करण्यात आला. नुकत्याच झालेल्या  ऑलिंपिक स्पर्धेतील   पुरुषांच्या ५०  मीटर रायफल थ्री पोझिशन क्रीडा प्रकारातील  कांस्यपदक विजेता स्वप्नील कुसाळेचा सत्कार
माजी मंत्री आमदार डॉ.विश्वजित कदम यांच्या हस्ते करण्यात आला.

Leave a Comment

और पढ़ें

जेवर एयरपोर्ट के द्धितीय चरण में अधिग्रहण की जा रही भूमि से प्रभावित कृषकों की समस्याओं का त्वरित गति से निस्तारण कराने के उद्देश्य से आज छेदी सिंह इंटर काॅलिज आकलपुर, म्याना जेवर में किसान चौपाल का किया गया आयोजन

जेवर एयरपोर्ट के द्धितीय चरण में अधिग्रहण की जा रही भूमि से प्रभावित कृषकों की समस्याओं का त्वरित गति से निस्तारण कराने के उद्देश्य से आज छेदी सिंह इंटर काॅलिज आकलपुर, म्याना जेवर में किसान चौपाल का किया गया आयोजन