Search
Close this search box.

अशोक नारकर यांच्या वाढदिवसा निमित्त सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान शिबीर

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सिंधुदुर्ग- विवेक परब

  • 45 रक्तदात्यांकडून पुण्यदान
  • सिंधु रक्त मित्र मंडळ उपाध्यक्ष सुशील परब यांचा वैद्यकीय अधीक्षक पंकज पाटील यांच्या कडून सत्कार

गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रक्ताचा तुटवडा भासू नये म्हणून सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान-कणकवली आणि उपजिल्हा रुग्णालय कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक कार्यकर्ते तथा क्ष किरण वैज्ञानिक अधिकारी श्री अशोक नारकर यांच्या ५४ व्या वाढदिवसाचे औचित्य साधत दिनांक ३० ऑगस्ट रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिरात ५४ रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला तर ४५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. ९ रक्तदाते तांत्रिक कारणास्तव रक्तदान करू शकले नाहीत.

यावेळी कणकवली उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.पंकज पाटील, नायब तहसिलदार श्री यादव, पाटील, डॉ.धनंजय रासम, ऍड अभिजित सावंत, महानंदा चव्हाण, डोंगरे, हनमंते, तिवरेकर मॅडम, बुचडे भाऊ, भोसले मॅडम व तिप्पे मॅडम तसेच रुग्णालयाचे कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

शिबिर यशस्वी होण्यासाठी सुशिल परब, अशोक नारकर, दुर्गाप्रसाद काजरेकर, किरण सामंत, मकरंद सावंत, अमोल भोगले, अभिषेक नाडकर्णी, रुजाय फर्नांडिस आदींनी मेहनत घेतली.

Leave a Comment

और पढ़ें