Search
Close this search box.

तासगावातील काळे बालक मंदिर व खुजट बालविहार मध्ये दहीहंडीचा जल्लोष…

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

प्रतिनिधी – अतुल काळे

  • शाळेत होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीची होते ओळख : मंजुषा जाधव

  सांगली/ तासगाव : येथील सौ.रे.रा. काळे बालकमंदिर व शांताबाई शंकर खुजट बालविहार तासगाव मध्ये गोकुळाष्टमी व दहीहंडी कार्यक्रम मंगळवार दिनांक २७ ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

शाळेत घेतल्या जाणाऱ्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमातून मुलांना भारतीय संस्कृतीची ओळख होते व जीवनमूल्ये जोपासली जातात. असे प्रतिपादन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुण्या सौ. मंजुषा जाधव यांनी केले.

 

मोठ्या गटातील विद्यार्थ्यांच्या ईशस्तवन व स्वागतगीताने कार्यक्रमास सुरुवाती झाली. नर्सरी, लहान गट व मोठ्या गटातील विद्यार्थ्यांनी कृष्ण गीतांवर आधारित नृत्ये सादर केली. मोठ्या गटातील विद्यार्थ्यांनी कृष्ण जन्मला ग सखे, आला रे आला गोविंदा या गीतावर ताल धरत दहीहंडी फोडली. लहान गटातील विद्यार्थ्यांनी यशोदा का नंदलाला तर नर्सरीतील विद्यार्थ्यांनी दही दूध लोणी या गाण्यांवर ताल धरत कार्यक्रमात रंगत आणली. कृष्ण आणि राधेच्या वेशात आलेल्या बालचमुने सर्व उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले होते.

कार्यक्रमास मुख्याध्यापक सुभाष बल्लाळ, अधीक्षक योगेश खाडीलकर, पर्यवेक्षिका पल्लवी जोशी, शाळेतील बालचमू उपस्थित होते. हार्मोनियम साथ सौ. नम्रता खरे यांनी तर तबला साथ माजी विद्यार्थी सोहम गुरव यांनी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. अपर्णा मुळे यांनी केले. सौ. श्रुती काळे यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Leave a Comment

और पढ़ें