हिरालाल लोथे प्रतिनिधी नाशिक
नाशिक – अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीने रस्त्यांची सर्वीकडेच झालेली दैना लक्षात घेऊन, तातडीने रस्ते बांधकाम विभाग पाच जिल्ह्याचे मुख्य अभियंता प्र. औटी यांच्या कार्यालयात धाव घेतली यावेळी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय सरचिटणीस अमोल भागवत, नाशिक शहर सचिव दिनेश झुटे, कला अध्यक्ष संजय बलकवडे, शहर संघटक रमेश चैवले, जनसेवक देविदास आंबिलकर, जनसेवक संजय पाटील, महिला शहर उपाध्यक्ष शेफाली शर्मा, जनसेविका हसीना शेख, तालुका प्रतिनिधी श्याम डावरे, मेघा कांबळे अनिता सोनवणे प्रकाश खडसे आणि संजय पाटील उपस्थित होते, त्यासोबत बांधकाम विभागाचे पाच जिल्ह्याचे मुख्य अभियंता औटी साहेब, मुख्य कार्यकारी अभियंता अरुंधती शर्मा, वरिष्ठ अभियंता पालवे, सोनवणे, पवार आदी उपस्थित होते.
नासिक परिसरामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांची जन्मभूमी भगूर ते बिटको भगूर ते पांडुर्लीत भगूर ते बाण स्कूल विजयनगर सम्राट बिअर बार समोरील रस्ता सिन्नर फाटा ते एकलहरा सदर रस्ता जुना आडगाव नाका ते मसरूळ सातपूर मधील सातपूर कॉलनी पाथर्डी फाटा ते देवळाली कॅम्प तसेच नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण परिसरातील बरेचशे रस्ते सध्या अतिशय धोकादायक परिस्थितीमध्ये आहे यावेळी बोलताना राष्ट्रीय सरचिटणीस अमोल भागवत यांनी टप्प्याटप्प्याने मागील वर्षापासून आम्ही सतत याचा पाठपुरावा घेत आहोत. मागील वर्षी जिल्हा प्रशासन नगरपरिषद प्रशासन कॅन्टोन्मेंट प्रशासन आदी प्रशासनांना आम्ही रस्ते बनवताना किमान तीन वर्ष टिकतील अशा चांगल्या पद्धतीचे रस्ते बनवावे असे सांगितले होते परंतु त्यावर अंमलबजावणी झाली नाही रस्ते बनवताना त्यामध्ये सामग्रीचे प्रमाण रस्त्यांचा दर्जा अतिशय कमकुवत असतो. यावर देखील त्यांनी लक्ष वेधले.
सदर रस्ते लवकरात लवकर बांधकाम विभागाने पूर्ण करण्यासाठी शक्यतेवढे प्रयत्न करावेत, सदर बाबतीची माहिती आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुद्धा पाठवलेली आहे.
यापुढे जनतेचे होणारे हाल आमच्याकडून पहावले जाणार नाही, नाइलाजास्तव रस्त्यांच्या दुरावस्थे बाबतीत आम्हाला राज्यव्यापी आंदोलन करण्यास भाग पाडू नका, येत्या गणेशोत्सव काळापर्यंत आपण रस्ते सुव्यवस्थित करावे या कामाला आपण प्राधान्य देऊन, सर्व सामान्य जनतेला दिलासा द्यावा अशी विनंती करण्यात आली.
यावेळी बोलताना अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे पदाधिकारी शेफाली शर्मा, संजय बलकवडे, हसीना शेख, रमेश चेवले, दिनेश दादा झुटे, श्याम डावरे, देविदास आंबिलकर, मेघा कांबळे, दिलीप गायकवाड यांनी देखील आपापल्या परिसरामध्ये लवकरात लवकर रस्ते झालेच पाहिजे, अन्यथा जनआंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला