Search
Close this search box.

विटा – म्हैसाळ रस्त्याचे फोर लेन काँक्रीटिकरण करा : प्रशांत केदार यांची मागणी

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

प्रतिनिधी – अतुल काळे 

  • केंद्रीय सडक परिवहन व राज्यमार्ग मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन

 सांगली/तासगाव : राष्ट्रीय महामार्ग अखत्यारीत असणारा विटा – म्हैसाळ राज्य मार्ग क्र.160 वाहतुकीस अरुंद आहे. अरुंद रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडून अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी विटा – म्हैसाळ रस्त्याचे फोर लेन सिमेंट काँक्रीटीकरणं करावे अशी मागणी दलित महसंघाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत केदार यांनी केली आहे. याबाबत केंद्रीय सडक परिवहन व राज्यमार्ग मंत्री नितीन गडकरी व राष्ट्रीय महामार्ग कार्यकारी अभियंता मुधाळे यांचेकडे निवेदन देण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्रीय महामार्ग क्र.160 मधील विटा ते म्हैसाळ रस्ता 65 किमी लांबीचा असून तो खूप अरूंद आहे. हा रस्ता सांगली, मिरज तसेच कर्नाटक राज्यात जाण्याचा प्रमुख मार्ग आहे. तसेच कराड-नागज, कराड-जत आणि रत्नागिरी-नागपूर रस्त्यांना जोडणारा प्रमुख महामार्ग आहे. पूर्वी विटा ते कुमठे फाटा रस्ता जुना राज्यमार्ग होता. तर कुमठे फाटा ते म्हैसाळ रस्ता जुना जिल्हामार्ग होता. 2017 मध्ये सदर रस्ता राष्ट्रीय महामार्गाकडे वर्ग करण्यात आला. त्यामुळे या रस्त्यावर वाहतुकीची वर्दळ पूर्वीपेक्षा अधिक वाढली आहे. परंतु रस्ता मात्र अरुंद आहे. रस्त्याला साईड पट्ट्या नाहीत. अरुंद रस्त्यावरून दुहेरी वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करीत आहेत.

सदर रस्त्याच्या दोन्ही बाजूला बागायती क्षेत्र मोठे असल्याने रस्ता अनेक ठिकाणी खचला आहे. रस्त्याला समांतर पातळी नाही. पावसाचे पाणी रस्त्यावर साचून मोठे खड्डे पडत आहेत. रस्त्यावरील खड्यांवर दुरुस्तीच्या नावाखाली प्रतिवर्षी कोट्यावधी रुपये खर्ची पडत आहेत. यातुन ठेकेदार व अधिकारी यांना लक्ष्मीदर्शन आहे. देखभाल दुरुस्तीवर कोट्यावधी रुपये खर्चून वाहतूक कोंडी व अपघाताचा प्रश्न सुटणार नाही. त्यावर ठोस कायमस्वरूपी उपाययोजना गरजेची आहे. यासाठी विटा-म्हैसाळ रस्त्याचे फोर लेन काँक्रीटीकरण करण्यात यावे अन्यथा या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी वेळोवेळी निदर्शने व आंदोलनाची भूमिका घेणार असल्याचे प्रशांत केदार यांनी निवेदनात म्हटले आहे.

Leave a Comment

और पढ़ें