Search
Close this search box.

बालक मंदिर, बालविहार मध्ये ‘रक्षाबंधन’ उत्साहात

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

प्रतिनिधी – अतुल काळे

सांगली/तासगाव : बहीण भावाच्या पवित्र,अतुट नात्यांची आठवण करून देणारा रक्षाबंधनाचा सोहळा सौ.रे.रा. काळे बालक मंदिर व शांताबाई शंकर खुजट बालविहार, तासगाव येथे उत्साहात संपन्न झाला. लहान गट, मोठा गट तसेच शिशुगट यातील विद्यार्थ्यांसाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुलींनी मुलांचे औक्षण करून राखी बांधली व मुलांनीही आपल्या बहिणींना भेटवस्तू दिली. विद्यार्थ्यांच्या डब्यामध्ये खाऊ म्हणून नारळी भात देण्यात आला. या समारंभासाठी आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती. नारळी व राखी पौर्णिमा सणाची माहिती शिक्षिकांनी मुलांना सोप्या भाषेत समजावून सांगितली.
या समारंभासाठी शालाधिक्षक योगेश खाडिलकर, मुख्याध्यापक सुभाष बल्लाळ पर्यवेक्षिका सौ.पल्लवी जोशी मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Comment

और पढ़ें