Search
Close this search box.

मुंबई-नाशिक महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांचा आणि वाहतूक कोंडीचा नागरिकांना होत असलेल्या त्रासाची दखल घेऊन काल मुंबईत बैठक

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

राजेंद्र वाघ प्रतिनिधी मुंबई

मुंबई। नाशिक महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांचा आणि वाहतूक कोंडीचा नागरिकांना होत असलेल्या त्रासाची दखल घेऊन काल मुंबईत बैठक घेतली होती. त्याअनुषंगाने बैठकीत सुचवलेला खड्डे बुजवण्याचा पर्याय आणि त्यांच्या अंमलबजावणीची स्वतः दौरा करून पाहणी केली.

यावेळी खारीगांव पूल, साकेत पूल येथे तयार होत असलेल्या नवीन पुलाच्या कामाचा आढावा घेतला. त्यानंतर ठाणे-नाशिक महामार्गावर शहापूर जवळील तळवली गावापाशी सुरू असलेल्या खड्डे बुजवण्याचा कामांचा स्वतः आढावा घेतला. यावेळी जिओ पॉलिमर टेक्नोपॅचचा वापर करून हे खड्डे बुजवण्यात येत आहेत. यामुळे अल्पावधीतच रस्त्यावरील खड्डे बुजवून ते लगेचच कडक होऊन अवजड वाहनेही सहज यावरून ये-जा करू शकतील.

तसेच यावेळी वाशिंद, परिवार गार्डन येथे सुरू असलेले ओव्हरपास, आसनगाव येथील रेल्वे पुलाच्या कामाचा देखील आढावा घेतला. ओव्हरपास जवळील सर्व्हिस रोड अत्यंत खराब झाल्याने तिथे वाहतूक कोंडी होत होती. ही कोंडी टाळण्यासाठी हे सर्व्हिस रोड क्विक रॅपिड सेटिंग हार्डनर (एम -60) च्या मिश्रणाचा वापर करून तयार करण्यात येत आहेत. येत्या काही दिवसात हे रस्ते पूर्णपणे तयार होतील, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले. तसेच रेल्वे पुलाचे काम वेगाने करण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

यावेळी एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड, ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव, ठाणे वाहतूक पोलीस तसेच ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डी.एस.स्वामी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, एमएसआरडीसी तसेच संबंधित विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित हो.

Leave a Comment

और पढ़ें