Search
Close this search box.

बसेस वेळेत पाठवा, प्रवाशांची गैरसोय होऊ देऊ नका : सुनील भोकरे

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

प्रतिनिधी – अतुल काळे

  • मध्ये प्रवाशी राजा दिन, कामगार पालक दिन साजरा

सांगली/ तासगाव : राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस वेळेत पाठवा, ग्रामीण भागासाठी ज्यादा बसेस सुरू करा, बस स्थानकाची स्वच्छता राखा आणि प्रवासी शौचालय स्वच्छ ठेवा यासह विविध सूचना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे सांगली विभाग नियंत्रक अनिल भोकरे यांनी दिल्या. प्रवाशी राजा दिनानिमित्त तासगाव बस स्थानकामध्ये प्रवाशांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या. प्रवाशांमध्ये असणाऱ्या सोयी -गैरसोयी याची चर्चा करून तासगाव आगारातील अधिकाऱ्यांना योग्य सूचना दिल्या. यावेळी विभागीय वाहतूक अधिकारी श्रीमती वृषाली भोसले, तासगाव आगार व्यवस्थापक, दयानंद पाटील, सहाय्यक वाहतूक अधिकारी संजय माने, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. सांगली विभाग नियंत्रक यांनी प्रत्यक्ष भेटून समस्या जाणून घेतल्या. एसटी बसेस च्या वेळेत बदल आणि जादा गाड्या उपलब्ध करून देण्याची मागणी मान्य केल्याबाबत प्रवासी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.
दरम्यान, कामगार पालक दिनानिमित्त विभाग नियंत्रक कामगार अधिकारी प्रवीण पाटील यांनी तासगाव आगारातील चालक, वाहक, वर्कशॉप कर्मचारी यांच्या समस्या समजून घेतल्या. कामगारांना येणाऱ्या अडचणी वेळोवेळी दूर करण्याचे आदेश आगार व्यवस्थापकांना दिले.

Leave a Comment

और पढ़ें