Search
Close this search box.

तासगाव आगाराचे विभागात विक्रमी उत्पन्न आषाढी निमित्त 277 बस फेऱ्यांमधून 17 लाखाची कमाई

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

प्रतिनिधी – अतुल काळे

सांगली/तासगाव : आषाढी एकादशी निमित्त पंढरीला जाणाऱ्या पांडुरंग भक्तांसाठी प्रवासाची सोय करत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सांगली विभागातील तासगाव आगार हा उत्पन्न आणि एसटी बस फेऱ्यांमध्ये अव्वल ठरला असून आगार व्यवस्थापक आणि आगारातील कर्मचारी अधिकारी वर्गाने घेतलेल्या अथक प्रयत्नामुळे प्रवासी वर्गातून समाधानात व्यक्त होत आहे.

आषाढी एकादशीनिमित्त नेहमीच विठुरायाच्या दर्शनासाठी भक्तांचा ओघ पंढरपूरकडे सुरू असतो. या भक्तांची प्रवासाची सोय गरजेचा घटक आहे. सांगली जिल्ह्यातून जाणाऱ्या भक्तांची वाढणारी संख्या लक्षात घेता सांगली विभागाकडून पंढरपूर कडे जाणाऱ्या अतिरिक्त गाड्यांचे नियोजन करण्यात आले. यामध्ये तासगाव आगाराने 26 एसटी बसेस च्या माध्यमातून तब्बल 277 विक्रमी फेऱ्या पूर्ण करत आषाढीनिमित्त झालेल्या फेऱ्यांमधून तासगाव आगाराने 1687178 रू. उत्पन्नाची कमाई केली. सांगली विभागातील 10 आगारातील उत्पन्नामध्ये तासगाव आगार अव्वल ठरला आहे. एसटी महामंडळाकडून मिळालेल्या बसेसच्या उपलब्धतेमुळे प्रवासी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.

Leave a Comment

और पढ़ें