प्रतिनिधी -अतुल काळे
- वसंतरावदादा पाटील महाविद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात
सांगली/तासगाव : जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी गुरूंच्या मार्गदर्शनाची गरज प्रत्येकाला लागते आपली गुरु-शिष्यांची परंपरा अबाधित राखण्यासाठी गुरुविषयी आदर बाळगा असे उद्गार श्री.स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे आजीव सेवक व सांगली जिल्हा व विभाग प्रमुख प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे यांनी पद्मभूषण डॉ.वसंतरावदादा पाटील महाविद्यालय तासगाव येथे गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना काढले.ते पुढे म्हणाले जीवन जगायला शिकवतो तो गुरु ,दुःखाचा विसर पाडून आपल्या जीवनात आनंद आणतो तो गुरु,जन्मोजन्मी उपयोगी पडणारे ज्ञान देतो तो गुरु.एखादी विचारधारा ही सुद्धा आपला गुरु असू शकते. आई आपला पहिला गुरु आहे.गुरुच आपल्याला योग्य दिशा दाखवतो. जीवनात यशस्वी होण्यासाठी गुरूंची आवश्यकता असते.तरुणांनी गुरूंबद्दल कृतज्ञता ठेवावी,व्यसनापासून दूर राहून स्वयंशिस्तीने मनावर ताबा ठेवावा आणि जीवनात यशस्वी व्हावे.आपले ध्येय निश्चित करून ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले.
यावेळी उपप्राचार्य जे.ए. यादव, डॉ.मेघा पाटील यांनी मनोगते व्यक्त केली.कु.पायल पाटील सौरभ पाटील या विद्यार्थ्यांनी गुरूंविषयी असणारा आदरभाव आपल्या मनोगतातून व्यक्त केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु.प्रतिक्षा मुळीक हिने केले तर आभार कु.सानिका साळुंखे हिने मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. दिव्या धुमाळ हिने केले. कार्यक्रमाला डॉ.अमोल सोनवले प्रा.पी.आर.खाडे , प्रा.सविता कोळेकर यांसह महाविद्यालयातील प्राध्यापक विद्यार्थी -विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.