Search
Close this search box.

वाहतुकीस अडथळा ठरणारी गाडी बनली चर्चेचा विषय ; नागरिकांतून संताप व्यक्त

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

प्रतिनिधी – अतुल काळे

सांगली/तासगाव : तासगाव शहरातील सिद्धेश्वर रोड या मुख्य मार्गावर असणाऱ्या वंदेमातरम् चौकामध्ये उभी असलेली चार चाकी चर्चेचा विषय ठरला असून उभ्या असलेल्या गाडीच्या मागील काचेवर महाराष्ट्र पोलीस असा स्टिकर लावण्यात आला असल्याने पोलिसांचीच गाडी वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या ठिकाणी उभी असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत होता.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, शुक्रवार दिनांक 19 जुलै रोजी सायंकाळी 5:30 च्या दरम्यान काळ्या रंगाची महागडी चार चाकी गाडी ( MH 10 EE 1558) वंदे मातरम चौक येथे येऊन थांबली. गाडीमधून आलेले तीन पुरुष, एक महिला आणि एक लहान मूल अशी पाच जण जवळच असणाऱ्या दाबेलीच्या गाड्याजवळ गेली. त्या ठिकाणी त्यांनी छानसा दाबेलीचा आस्वाद घेतला आणि पुन्हा गाडीमध्ये बसून ही सर्व मंडळी एसटी स्टँड च्या दिशेने रवाना झाली.
सदरची गाडी चौकामध्ये जवळपास १० मिनिटे उभी असताना जवळून जाणारे पादचारी, दुचाकीस्वार, चार चाकी धारक या गाडीकडे बघून काहीतरी पुटपुटत असताना दिसून आले. गाडीच्या मागील काचेवर महाराष्ट्र पोलीस लिहिलेल्या स्टिकर मुळे पोलिसाचीच गाडी वाहतुकीस अडथळा निर्माण करण्याजोगी उभी असल्याचा राग व्यक्त होत होता.
तासगाव शहरात वाहतूक कोंडी समस्या समस्त नागरिकांची डोकेदुखी बनली असताना रस्त्याच्या मधोमध उभ्या असणाऱ्या या चार चाकी गाडीवर इतर वाहनांवर होणाऱ्या कारवाई प्रमाणे तासगाव वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस कारवाई करणार का? असा सवाल उपस्थित केला जात होता.

Leave a Comment

और पढ़ें