Search
Close this search box.

ॲड.एम.एन.देशमुख महाविद्यालय राजूर येथे पदव्युत्तर विषय सुरू करण्यास शासनाची मान्यता

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

प्रतिनिधी -: सचिन मुतडक

राजूर : राजूर ता – अकोले या आदिवासी क्षेत्रातील ” सत्यनिकेतन ” चे ॲड.एम.एन.देशमुख कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय येथे शैक्षणिक वर्ष २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून पदव्युत्तर स्तरावर एम.ए. अर्थशास्त्र, मराठी, हिंदी व भूगोल हे नवीन विषय सुरू करण्यास शासनाने नुकतीच मान्यता दिली आहे. अशी माहिती महाविद्यालयाचे विद्यमान प्राचार्य प्रोफेसर डॉ. भाऊसाहेब देशमुख यांनी दिली आहे. सदर विषय मान्यतेमुळे आदिवासी परिसरातील विद्यार्थ्यांना पदव्युत्तर स्तरावरील शिक्षण घेणे शक्य होणार असून, या पुढील काळात महाविद्यालयात संशोधन केंद्र सुरू करता येणार आहे. त्यामुळे सदर संशोधन केंद्र अंतर्गत सदर विषयात विद्यावाचस्पती (पीएचडी) पदवी घेणे, आदिवासी विद्यार्थ्यांना शक्य होईल. अशी माहिती देखील प्राचार्य डॉ. भाऊसाहेब देशमुख यांनी यावेळी दिली. तरी अकोले तालुक्यातील आदिवासी विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये महाविद्यालयात लवकरात लवकर प्रवेश घ्यावा, असे आवाहन

सत्यनिकेतन संस्थेचे अध्यक्ष मा. ॲड.मनोहरराव देशमुख साहेब ,सचिव मा.मारुती मुठे, कोषाध्यक्ष मा. विवेकजी मदन व

सत्यनिकेतन संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनी केले आहे. या नवीन विषय मान्यतेमुळे आदिवासी परिसरात आनंदाचे वातावरण असून महाविद्यालयाचे प्राचार्य व संस्था प्रतिनिधी यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. सदर विषयासाठी प्रवेश मर्यादीत आहे. प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज भरणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी कला शाखाप्रमुख डॉ.भरत शेणकर (९४२३१६४५२१)

प्राचार्य डॉ.देशमुख ( ८७६६५७३००७) यांचेशी संपर्क साधावा. अशी माहिती महाविद्यालयाच्या कार्यालयाकडून प्राप्त झाली आहे.

खरोखर अतिशय चांगली संधी उपलब्ध झाली असून, आपल्या ग्रामीण भागातील गरजूवंत विद्यार्थांनी संधीचा फायदा घ्यावा व आपले शिक्षण पूर्ण करावे.

Leave a Comment

और पढ़ें