बहुप्रतिक्षित रिंगरोडचे काम लवकरच मार्गी लागेल : संजयकाका पाटील
शेतकऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत केले स्पष्ट
प्रतिनिधी- अतुल काळे
सांगली/तासगाव : तासगाव शहरातील वाहतूक कोंडीवर उपाय असणाऱ्या बायपास रिंगरोडचे काम लवकरच सुरु करण्यात येणार असलेबाबत माजी खा. संजयकाका पाटील यांनी शेतकऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत स्पष्ट केले. तासगाव शहरातील बहुचर्चित व बहुप्रतिक्षित अशा भिलवडी नाका ते विटा रोड या बायपास रिंगरोडचे काम लवकरात लवकर पुर्ण करून तासगावातील वाहतूक कोंडी फोडून वाहतूक सुरळीत व्हावी याकरीता माजी खासदर संजयकाका पाटील प्रयत्नशील राहिले आहेत.
नियोजित बायपास रिंग्रोड हा पुर्वीपासून जसा प्रस्तावित आहे तोच लवकरात लवकर विकसित करण्यात येणार आहे. श्री. पाटील यांनी संबंधीत शासकीय अधिकाऱ्यांसोबत व शेतकरी यांचेसोबत वेळोवेळी चर्चा करुन हा प्रश्न सोडवण्यात आला असलेचे सांगितले. तसेच विटा रोड ते चिंचणी रोड या बायपास रिंगरोड करीता पाठपुरावा सुरु असून त्याकरीताही लवकरच निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. त्यामुळे तासगाव मधील वाहतुक कोंडीचा प्रश्न कायमस्वरुपी संपणार आहे. यावेळी भाजपचे तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा प्रमुख प्रभाकरबाबा पाटील, तासगाव शहरातील पदाधिकारी, शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.