Search
Close this search box.

क्रांतिसिंह नाना पाटील सामाजिक पुरस्कार ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक मा.तुषार गांधी यांना जाहीर. 

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सांगली /रिपोर्टर हेमंत व्यास. 

तुषारजी गांधी हे महात्मा गांधी यांचे पणतू आहेत. महात्मा गांधीचे राहीलेले कार्य पुढे चालू ठेवणेचे काम ते करत आहेत.त्यानी महात्मा गांधी फौंडेशनची स्थापना केली आहे. कापड गिरणी कामगारांच्यासाठी निर्माण केलेल्या लोकसेवा ट्रस्टचे माध्यमातून ते गिरणी कामगार व त्यांच्या मुलासाठी काम करत आहेत. कुपोषणाच्या विरुद्ध अंतरराष्ट्रीय संस्थेचे ते सदिच्छा दूत म्हणून काम करत आहेत.आस्ट्रेलीयातील इंडीयन रुरल डेव्हलपमेंट फौंडेशनचे ते अध्यक्ष आहेत.महात्मा गांधी स्मारक निधीचे विश्वस्त म्हणून काम करत आहेत. जळगाव येथील गांधी रिसर्च फौंडेशनचे संचालक म्हणूनही ते कार्यरत आहेत. सर्व समाजमधे बंधुभाव, शांती राहीली पाहीले. सामाजिक भेदभाव नष्ट झाला पाहिजे यासाठी ते आयुष्यभर कार्य करत आहेत. त्यांच्या या कार्याची नोंद घेऊन आम्ही क्रांतिसिंह नाना पाटील सामाजिक पुरस्कार २०२४ त्यांना देणेचा निर्णय घेतला आहे. दिनांक ११ आगष्ट २०२४ रोजी विटा येथील क्रांतिसिंह नाना पाटील सभागृहात दु. १:३० व्हा. जेष्ठ पत्रकार आणि विचारवंत मा. ज्ञानेश महाराव यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना देण्यात येणार आहे. मानपत्र, सन्मानचिन्ह, पुष्पहार, श्रीफळ आणि रु. २१०००/- रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

या अगोदर हा पुरस्कार आचार्य शांताराम गरुड, क्रांतिवीर नागनाथअण्णा, प्रा. डॉ. एन. डी. पाटील, मा. आमदार गणपतराव देशमुख, काम्रेड क्रुष्णा मेणसे ,साथी म्रुणालताई गोरे,प्रा. डॉ. आ. ह. साळुंखे, मेधाताई पाटकर, न्यायमुर्ती कोळसे पाटील, न्यायमुर्ती बी.एन. देशमुख, मा. विकास आमटे, काम्रेड अजित अभ्यंकर, डॉ अभय बंग, पत्रकार पी. साईनाथ, काम्रेड अशोक ढवळे, मा. गणेश देवी, काम्रेड सिताराम येच्युरी, काम्रेड भालचंद्र कांगो, काम्रेड वृंदा करात, काम्रेड अतुल कुमार अंजान इ. मान्यवरांना देणेत आला आहे.आता पर्यंत २३ मान्यवरांनचा सन्मान केला असून चालू वर्षी चा २४ वा पुरस्कार आहे.

Leave a Comment

और पढ़ें