Search
Close this search box.

जयमहाराष्ट्र संचलीत श्री शिवप्रभु प्राथमिक विद्यालयाचे चार विद्यार्थी जिल्ह्यात गुणवत्ता यादीत.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

रिपोर्टर सुहास कराडकर कडेगांव.

  • तर एका विद्यार्थीनीची नवोदय साठी निवड.

जय महाराष्ट्र शिक्षण संस्था संचलीत श्री शिवप्रभु प्राथमिक विद्यालयाचा इयत्ता ५वीशिष्यवृत्तीपरिक्षा २०२४ मध्ये सांगली जिल्हागुणवत्ता यादीत शहर विभागातून विद्यालयाचे तब्बल चार विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादित यश संपादन केले. जय महाराष्ट्र शिक्षण संस्था संचलीत श्री शिवप्रभु विद्यालयाचे विद्यार्थी जिल्हास्तरावर सातत्याने विद्यालयाचे नाव फडकवितायत त्याबद्दल कडेगांव तालुक्यातून विद्यार्थ्यांचे व विद्यालयाचे अभिनंदन होत आहे. वेदिका संतोष जंगम जिल्ह्यात १६वी तर कडेगांव तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावून पलुस येथील नवोदय विद्यालयासाठी निवड झाली आहे. तर नक्ष जोतिराम जाधव हा विद्यार्थी जिल्ह्यात १९वा तर तालुक्यात दुसरा, जान्हवी संभाजी यादव तालुक्यात ३रा क्रमांक व अनय दिपक देशमुख तालुक्यात चौथा क्रमांक पटकावुन घवघवित यश संपादन केले आहे.यासर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्षपदी राजाराम डांगे यांच्या हस्ते गुलाब पुष्प व श्रीफळ देऊन अभिनंदन करण्यात आले यावेळी संस्थेचे सचिव प्रा. दिपक कुलकर्णी, वसंत इनामदार, संस्थेचे उपाध्यक्ष सुरेश यादव उपस्थित होते. यशस्वी विद्यार्थ्यांना विद्यालयाचे शिक्षक जाधव सर यांचे व मुख्याध्यापक, शिक्षक स्टाफ यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Comment

और पढ़ें