Search
Close this search box.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कागद ऑनलाईन पूर्तता व माहिती कॅम्प चे मालवण येथे आयोजन-सौ वैष्णवी मोंडकर

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सिंधुदुर्ग-विवेक परब

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजचेचा लाभ समाजातील 21 ते 65 वयोगटातील विवाहीत, घटस्फोटित, निराधार, परितक्त्या, विधवा महिलाना होण्यासाठी विकास मालवण संस्था, मातृत्ववरदान फाऊंडेशन च्या माध्यमातून हॉटेल श्री महाराज मालवण पेट्रोलपम्प नजीक मालवण येथे दिनांक 5/7/24 रोजी शिबीराचचे सकाळी 10.30 ते सा.4 वाजता या वेळेत आयोजन केले असून या शिबिरात उत्पन्न दाखला, वय अधिवास दाखला संदर्भात कागदपत्र पूर्ण भरून घेतले जाणार असून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरून घेतले जाणार आहेत यासाठी शासनाच्या वतीने तलाठी व पोलीस पाटील उपलब्ध राहणार आहेत.
सदर योजनेच्या पात्र महिलांनी रेशन कार्ड, घरपत्रक उतारा, सातबारा, मतदान कार्ड, आधार कार्ड, पासपोट साईज फोटो शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म प्रमाणपत्र विवाहित असल्यास लग्न प्रमाणपत्र किंवा गॅझेट, बँक पासबुक हे कागद घेऊन वरील वेळेत उपस्थित रहावे अर्जदार महिलेचे वार्षिक उत्पन्न हे 2 लाख 50 पेक्षा कमी असणे आवश्यक आहे. सदर योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील महिलांना सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे त्यांचे आर्थिक व सामाजिक पुनर्वसन करणे,राज्यातील महिलांना स्वावलंबी व आत्मनिर्भय करणे,महिलांना सशक्तीकरणासाठी चालना देणे अश्या महिलांवर अवलंबित मुलांच्या आरोग्य व पोषण स्थितीत सुधारणा करण्याचा असून 31 ऑगस्ट 2024 पर्यंत सदर सादर करायचे आहेत.लाभार्थी महिला ही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे गरजेचे असून वय 21 ते 65 वर्षे असणे गरजेचे आहे अर्ज करणाऱ्या महिला लाभार्थीचे बँक खाते आवश्यक आहे सदरं योजना विवाहित.घटस्फोटित,विधवा,परितक्त्या,निराधार महिलासाठी शासन राबविणार आहे ज्यांचा वय अधिवास दाखल्या ऐवजी 15 वर्षा पूर्वीचे जन्म प्रमाण पत्र,शाळा सोडल्याचा दाखला ,मतदान कार्ड ,रेशन कार्ड, या पैकी एक पुरावा गृहीत धरला जाणार आहे तसेच ज्या पात्र महिलेकडे 2.50 उत्पन्नाचा पुरावा नसल्यास पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड धारकांना या दाखल्यासाठी सूट देण्यात आली आहे तसेच वरील निकषात बसणाऱ्या महिला बरोबरच कुटूंबातील एका अविवाहित महिलेला देखील वरील निकषात बसल्यास लाभ मिळणार आहे .शहरातील जास्तीत जास्त महिलांनी तसेच महिलांसाठी काम करणाऱ्या संस्थांनी आपल्या संपर्कातील महिलांना या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन सौ वैष्णवी मोंडकर उपाध्यक्ष भाजपा महिला आघाडी मालवण शहर तसेच अध्यक्ष विकास मालवण संस्था,मातुत्ववरदान फाऊंडेशन यांनी केले आहे.

Leave a Comment

और पढ़ें