Search
Close this search box.

थकीत बिलासाठी ठेकेदार नगरपालिकेत बिले न मिळाल्यास उपोषणाचा इशारा

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

प्रतिनिधी -अतुल काळे

सांगली/तासगाव : तासगाव नगरपरिषदेकडून ठेका घेऊन कामे पूर्ण करूनही कामांची बिले मिळत नसल्याने संतप्त झालेल्या ठेकेदारानी शुक्रवारी तासगाव नगरपालिकेत धाव घेतली असून दहा दिवसाच्या आत बिले न मिळाल्यास नगरपालिकेसमोर उपोषणास बसणार असल्याचा इशारा नगरपालिका कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन च्या वतीने देण्यात आला. एरवी ठेका मिळवण्यासाठी धडपड करणारे कॉन्ट्रॅक्टर हे ठेका घेऊन केलेल्या कामाचे बिल मिळत नसल्याने नगरपालिकेत एकत्र आल्याचे चित्र तासगावात दिसून आले. यावेळी इंद्रजीत चव्हाण, सुनील जाधव, अजय पाटील, अविनाश पाटील, किरण जामदार, मनोज चव्हाण, ओंकार शेटे, तुषार कदम, ओंकार सावंत, अभिषेक धाबुगडे, संजय लुगडे, उमेश गावडे, विनोद धोत्रे, लखन पाटील, राजेंद्र भंडारे, सुहास शिंत्रे, प्रकाश पाटील, शुभम थोरबोले, चंद्रकांत मिरजकर, नयन चौगुले, विशाल माळी, स्वप्नील थोरबोले, राहुल माळी, अनिल पवार, प्रकाश माळी, निवास धोत्रे, आदी कॉन्ट्रॅक्टर उपस्थित होते.
तासगावचे मुख्याधिकारी तथा प्रशासक पृथ्वीराज पाटील यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कॉन्ट्रॅक्टरने गेल्या दोन वर्षापासून केलेल्या कामांचे डिपॉझिट वेळेत मिळाले नाही. पूर्ण कामाची बिले व त्या कामांची थर्ड पार्टीसाठी मागे ठेवलेली दहा टक्के रक्कम अद्याप मिळाली नाही. कॉन्ट्रॅक्टर हा आर्थिक दृष्ट्या अडचणीत आला आहे. पैश्या अभावी बँकांचे कर्ज, सोनेतारण तसेच कामगारांचे पैसे अदा करणे अशक्य झाले आहे. नगरपालिकेने वारंवार तगादा लावून कामे पूर्ण करून घेतली पण ठेकेदारांनी केलेल्या कामाच्या बिलाचे काय? असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला. ठेकेदारांच्या बिलासाठी प्रशासनाकडे वेळ नाही का? दहा दिवसाच्या आत बिले मिळाली नाहीत तर सर्व कॉन्ट्रॅक्टर नगरपरिषदेसमोर आमरण उपोषणास बसणार आहोत असा इशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी झालेल्या चर्चेत मुख्याधिकारी पाटील म्हणाले, प्रशासनातील संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांशी तातडीने चर्चा करून आवश्यक सूचना दिल्या जातील. 2023 -24 मधील अडीच कोटी रुपयांची बिले देणे बाकी असून त्यासाठी आवश्यक असणारी प्रशासकीय प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून बिले देण्याचा प्रयत्न केला जाईल.

Leave a Comment

और पढ़ें