तासगावात साजरा होत आहे 117 वा श्री रामोत्सव

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

प्रतिनिधी – अतुल काळे

सांगली/तासगाव : येथील पैलवान कुटुंबीयांच्या श्रीराम मंदिर मधील 117 वा ‘श्रीरामोत्सव’ रविवार दिनांक 6 एप्रिल रोजी साजरा होत असून या सोहळ्याचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन पैलवान कुटुंबीयांनी केली आहे.

तासगाव मधील दाणे गल्ली येथे श्रीराम मंदिर आहे. या राम मंदिराची व्यवस्था पैलवान कुटुंबीय पाहत आले आहेत. यंदा होणारा श्रीराम उत्सव हा 117 वा साजरा होत आहे. प्रभू श्रीरामांचा जन्म काळ दुपारी 12 वाजता होणार असून एक वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सदरचा महाप्रसाद विठ्ठल मंदिर, शिंपी गल्ली तासगाव येथे होणार आहे. तरी याचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन स्वप्निल पैलवान व कुटुंबीयांनी केले आहे.

Leave a Comment

और पढ़ें