प्रतिनिधी – अतुल काळे
- ऍड.तेजस सन्मुख यांची प्रमुख उपस्थिती
सांगली/तासगाव : भावी आयुष्याचा जोडीदार निवडतांना जास्त अपेक्षा करणे व्यर्थ. त्यापेक्षा माणसं कशी आहेत, हेच पाहणे महत्त्वाचे. मुलगा कर्तृत्ववान हवा, मुलगी घर सांभाळून घेणारी हवी, एवढेच पाहावे. वाढत्या कौटुंबिक गरजा, त्या पूर्ण करण्याच्या अनुषंगाने ताणतणाव कौटुंबिक दुराव्यामुळे वधूवर पालक परिचय मेळावा ठिकठिकाणी आयोजित होणे आता आवश्यक बाब बनली असल्याचे प्रतिपादन ऍड. तेजस सन्मुख यांनी व्यक्त केले.
तासगाव येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जिवा शिवा सेना प्रतिष्ठानच्या पहिल्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित नाभिक वधुवर परिचय मेळावा व जागतिक महिला दिन कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळकृष्ण जाधव होते.पोलीस पाटील अनुराधा गायकवाड ,अरुंधती गायकवाड,राजश्री खंडागळे, सविता खंडागळे,वैशाली माने, मंदाकिनी सपकाळ प्रमुख उपस्थित होत्या.
प्रारंभी संत सेना महाराज , वीर शिवा काशीद , वीर जिवा महाले , सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते झाले. पहिल्या सत्रात सविता खंडागळे यांनी महिला दिनाचे महत्व विषद करतानाच उखाणे , संगीत खुर्ची असे मनोरंजनात्मक कार्यक्रम घेतले. यामध्ये उपस्थित महिलांनी सहभाग घेतला. दुसऱ्या सत्रात वधुवर परिचय मेळावा झाला. यामध्ये भावी वधूवरांसह सुमारे चारशेहून अधिक पालकांनी उपस्थिती दाखवली. यावेळी आष्टा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्यावतीने मोफत आरोग्य तपासणी व औषध उपचार करण्यात आले.
कार्यक्रमावेळी उपस्थितांचे स्वागत राजेश गायकवाड यांनी केले. प्रास्ताविक दत्तात्रय सपकाळ यांनी तर सूत्रसंचालन मंदाकिनी सपकाळ यांनी केले. आभार सुमित माने यांनी मानले. मेळावा समितीचे अध्यक्ष विजय साळुंखे, मार्गदर्शक सुभाष जाधव, सचिव प्रवीण जाधव ,प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष उमेश गायकवाड, खजिनदार सागर गायकवाड, प्रभाकर गायकवाड , विष्णू गायकवाड, अमित वास्के, नंदकुमार जाधव, धनाजी जाधव, दत्तात्रय साळुंखे, वैभव क्षीरसागर ,मारुती सूर्यवंशी
यांनी संयोजन केले. तर धनंजय गायकवाड, विनायक गायकवाड, सचिन माने यांनी विशेष सहकार्य केले.