प्रतिनिधी – अतुल काळे
सांगली/तासगाव : कृषी उत्पन्न बाजार समिती तासगावच्या आवारात चिंच या शेतीमालाची आवक सुरू झाली असून बुधवारी झालेल्या सौंद्यामध्ये शेतकरी सोमनाथ ठोंबरे यांच्या मालास प्रतिक्विंटल 10 हजार 601 रु. इतका उच्चांक इतर मिळाला असून एकूण 3 अडत दुकानांमध्ये 100 क्विंटल चिंच आवक झाली.
चरण महादेव हिंगमिरे यांच्या अमोल ट्रेडिंग कंपनी अडत दुकानांमध्ये चिंचेस हा उच्चांकी दर मिळाला. पांडुरंग पैलवान, सुनील पैलवान यांनी शेतकऱ्याकडून 2 पोती चिंच खरेदी केली. यावेळी बाजार समितीचे संचालक व्यापारी प्रतिनिधी कुमार शेटे, चंद्रकांत आडके, चरण हिंगमिरे, सुनील पैलवान, अतुल अडगळे, जीवन शहा, चंद्रकांत शिंदे तसेच चिंच उत्पादक शेतकरी उपस्थित होते. या सौद्यात उच्चांकी दर 10 हजार 601तर सरासरी दर 10 हजार 251 असा मिळाला. तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बेदाण्याबरोबरच चिंच उत्पादनालाही चांगला बाजारभाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी आपला चिंच शेतीमाल तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सौद्यांमध्ये विक्रीसाठी आणावा असे आवाहन सभापती युवराज दादा उर्फ सुनील भानुदास पाटील उपसभापती चंद्रकांत सत्तू जाधव यांनी केले आहे.