रिपोर्टर सुहास कराडकर
- :चिंचणी (अं) येथे कार्यकर्त्यांची संवाद बैठक
सांगली /कडेगांव न्युज: सर्व सामान्य जनतेला ज्ञात आहे. स्वर्गीय संपतराव देशमुख अण्णांनी मंत्रीपद नको पण टेंभू योजनेचा अट्टाहास धरला आणि तो पूर्ण केला. जि.प.अध्यक्ष असताना प्रत्येक गावाच्या विकासासाठी निधी देताना पक्षपात केला नाही म्हणून
या भागाचा विकास झाला. त्यांच्या विचारांचा वारसाच आम्ही पुढे चालवित आहे. विकासासाठी राजकारणात न अडकता मला संधी द्या, असे आवाहन पलूस कडेगांव विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी महायुतीचे अधिकृत उमेदवार संग्राम देशमुख यांनी केले.
ते चिंचणी (अंबक) या गावांमध्ये प्रचार दौऱ्या दरम्यान बोलत होते.यावेळी बिरोबा देवाचे दर्शन घेऊन अशीर्वाद घेतला.
यावेळी कडेगांव तालुक्यातील चिंचणी (अं) येथील काँग्रेस पक्षातील हणमंतराव तातोबा महाडीक सर यांनी संग्राम देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी मध्ये जाहीर प्रवेश केला.यावेळी मारूती माने,रामचंद्र महाडीक, विश्वास भाऊ महाडीक, पांडूरंग होनमाने, माणिक माने,
प्रमोद पाटील, प्रतिक्षा प्रदिप पाटील यांच्यासह कार्यकर्ते प्रचार दौऱ्यात सहभागी झाले होते.
यावेळी संग्राम देशमुख म्हणाले , मतदारसंघातील गेल्या अनेक वर्षापासून रखडलेली कामे मार्गी लागली. या मतदारसंघाचा पूर्वीचा इतिहास पाहिला तर पाण्याच्या प्रश्नासाठी संपतराव अण्णा देशमुख यांनी त्याग केला.टेंभू योजनेला गणपती दूध पितो असे म्हणणारेच आज ही ताकारी टेंभू योजनेचे श्रेय घेत आहेत. अण्णांनी एक वेगळ्या विचारांची माणसे एकत्र करून राजकारणामध्ये कर्तुत्वान माणसे उभी केली.
लोकहिताच्या अनेक योजना प्रभावीपणे राबविल्या आहेत. विकास साध्य करणे विकास पुढे नेऊन मतदार संघाचा कायापालट करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. ही निवडणूक परिवर्तनाची आहे. जनतेला पुन्हा महायुतीचे सरकार हवे आहे. या निवडणुकीत इतिहास घडवण्या साठी गट-तट विसरून ही निवडणूक मतदार संघातील प्रत्येकांची आहे असे समजून प्रयत्न करा. विकासाचा विजय आपल्या सर्वांच्या सहकार्याने करून दाखवू असा विश्वास संग्राम देशमुख यांनी व्यक्त केला.
यावेळी अभिजीत महाडीक म्हणाले, केंद्र व राज्य सरकारच्या योजना प्रभाविपणे राबवून त्या आमलात आणल्या. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून संग्राम भाऊंनी आमदारांना जेवढा निधी आणता आला नाही एवढा भरघोस निधी उपलब्ध केला यासाठी भाऊंच्या रूपाने आणि स्वर्गीय आण्णांचा वारसा आपल्याला जपायला हवा. येणाऱ्या मतदानाला सर्वांनी एकजूट होऊन आपल्या स्वच्छ पारदर्शी नेत्याला विधानसभेवर पाठवू हा निर्धार पक्का करण्याचे आवाहन अभिजीत महाडीक यांनी केले.
यावेळी अॅड. प्रमोद पाटील म्हणाले, सत्ता असुदे किंवा नसूदे संग्राम भाऊ देशमुख सदैव आपल्या कार्यकर्त्यांच्या पाठीमागे खंभीर उभे असतात.इथून पुढे जर आपल्याला ह्याच्या पेक्षाही विकास हवा असेल तर आता एकत्रितपणे एक महत्त्वाचा निर्णय घ्यायचा आहे.संग्राम देशमुख भाऊ यांना निवडून द्या! विकास कामे करण्यासाठी त्यांच्यावर विश्वास ठेवावा.
यावेळी सचिन माने यांनी आभार मानले.यावेळी चिंचणी गावातील भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी व सहकारी तसेच कार्यकर्ते, महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.