Search
Close this search box.

शांतता निर्माण करण्यासाठी महात्मा गांधी यांचे विचार आजही उपयुक्त – प्राचार्य डॉ मिलिंद हुजरे

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

प्रतिनिधी – अतुल काळे

सांगली/ तासगाव : भारताचे राष्ट्रपिता म्हणून परिचित असणारे महात्मा गांधी यांचे विचार आजही जागतिक शांतता निर्माण करण्यासाठी उपयुक्त आहेत असे मत प्राचार्य डॉ.मिलिंद हुजरे यांनी व्यक्त केले. पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील महाविद्यालय तासगाव येथे राज्यशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित भित्तिपत्रिका कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी बोलताना प्राचार्य डॉ.मिलिंद हुजरे म्हणाले, महात्मा गांधीजी यांचे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील योगदान अविस्मरणीय असे आहे.ब्रिटिश शासना विरोधात सत्य,अहिंसा,सत्याग्रह याचा वापर करून अनेक आंदोलने उभी केली.भारतीय जनतेने त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता.
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर शांतता निर्माण करण्यासाठी,संघर्ष आणि देशा देशात सुरू असणारी युद्धे रोखण्यासाठी महात्मा गांधी यांच्या विचारांची उपयुक्तता आजही आहे.गांधीजींच्या विचारातूनच जागतिक शांतता निर्माण होईल.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ.नितीन गायकवाड होते.यावेळी बोलताना ते म्हणाले,महात्मा गांधी यांच्या विचारांची ओळख आजच्या काळातील समाजाला करून देण्यासाठी भित्तीपत्रिकेच्या माध्यमातून प्रयत्न केला आहे.यावेळी नेहा सरवदे,सानिका फाळके या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी उपप्राचार्य जे. ए.यादव,डॉ.अमोल सोनवणे,डॉ.के.एन.पाटील यांचेसह सर्व शिक्षक,विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.नितीन गायकवाड यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.विलास साळुंखे यांनी केले.आभारप्रदर्शन प्रा.पूजा बुवा यांनी केले.

Leave a Comment

और पढ़ें

जेवर एयरपोर्ट के द्धितीय चरण में अधिग्रहण की जा रही भूमि से प्रभावित कृषकों की समस्याओं का त्वरित गति से निस्तारण कराने के उद्देश्य से आज छेदी सिंह इंटर काॅलिज आकलपुर, म्याना जेवर में किसान चौपाल का किया गया आयोजन

जेवर एयरपोर्ट के द्धितीय चरण में अधिग्रहण की जा रही भूमि से प्रभावित कृषकों की समस्याओं का त्वरित गति से निस्तारण कराने के उद्देश्य से आज छेदी सिंह इंटर काॅलिज आकलपुर, म्याना जेवर में किसान चौपाल का किया गया आयोजन