Search
Close this search box.

शिक्षकांनी बालकांच्या अंगभूत क्षमतांचा विकास सुलभकाच्या भूमिकेत राहून करावा : भाई उपाले

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

प्रतिनिधी – अतुल काळे

  • तासगावच्या चंपाबेन शाळेत विद्याभारतीचा शिक्षक उद्बोधन वर्ग उत्साहात संपन्न

सांगली/ तासगाव : बालकाचा विकास म्हणजे बालकाच्या अंगभूत क्षमतांचा विकास सुलभकाच्या भूमिकेत राहून शिक्षकांनी करावा. विकास करताना तो अनौपचारिक पद्धतीने कसा होईल यावर भर द्यावा तसेच बदलत्या शैक्षणिक धोरणांना शिक्षकांनी सकारात्मकतेने प्रतिसाद द्यावा. असे प्रतिपादन भाई उपाले यांनी केले. ते तासगाव येथील चंपाबेन शाळेत आयोजित उद्बोधन वर्ग शिबिरात बोलत होते.
लहान गट, मोठा गट आणि इ .पहिली व दुसरी च्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार असणाऱ्या पूर्व प्राथमिक वर्गांना शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी विद्याभारती पश्चिम महाराष्ट्र प्रांत शाखा तासगाव यांच्या वतीने आयोजित उद्बोधन वर्ग संपन्न झाला. विद्याभारती महाराष्ट्र तथा गोवा शिशु वाटिका प्रमुख श्री भाई उपाले यांनी मार्गदर्शन केले. त्याचबरोबर प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून शिक्षकांच्या शंकांचे समाधान त्यांनी यावेळी केले. विद्याभारती सांगलीच्या सक्रिय कार्यकर्त्या सौ संगीता बिळगी,सौ वैशालीताई जोगळेकर,बाल शाळेचे मुख्याध्यापक श्री बल्लाळ सर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या आयोजनाची भूमिका विद्याभारती तासगावचे संयोजक नितीन जोशी यांनी विशद केली. सौ पल्लवी जोशी यांच्या आभार प्रदर्शन आणि कार्यक्रमाची सांगता झाली. या शिक्षक उद्बोधन वर्गास शहरातील विविध शाळेतील शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

और पढ़ें