Search
Close this search box.

वसंतरावदादा पाटील महाविद्यालयाचा पै.प्रथमेश औताडे युवा महाराष्ट्र केसरी उपविजेता

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

प्रतिनिधी – अतुल काळे

सांगली/तासगाव : “ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यांसाठी शिक्षणप्रसार” हे ब्रीदवाक्य घेऊन ज्ञान प्रसार करणाऱ्या श्री.स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या वसंतरावदादा पाटील महाविद्यालयाचा पैलवान प्रथमेश औताडे हा पुणे येथे संपन्न झालेल्या युवा महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा उपविजेता ठरला. महाविद्यालयाच्या वतीने त्याचा सत्कार समारंभ आयोजित केला.विद्यार्थ्यांचा सर्वांगीन विकास हा आमचा ध्यास हे ध्येय बाळगून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मिलिंद हुजरे यांनी विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रात यश मिळवण्यासाठी प्रेरित केले.यावेळी बोलताना श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे अर्थसहसचिव आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मिलिंद हुजरे म्हणाले पैलवान प्रथमेश औताडे याने आई – वडील, महाविद्यालयाचे आणि तासगाव तालुक्याचे नाव उंचावले आहे. प्रथमेश औताडे हा बी.ए.भाग १ मध्ये शिकत असून अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेत आहे.तासगाव तालुक्यातील बलगवडे गावचा रहिवाशी असून त्याने छत्रपती शिवाजीराजे तालीम खवासपूर,कोल्हापूर येथे कुस्तीचे प्रशिक्षण घेतले आहे.मुलाला चांगला पैलवान घडवण्यासाठी वडिलांनी खूपच काबाडकष्ट केले आहे.भविष्यात हिंदकेसरी होण्याचा त्याचा मानस आहे.या सत्कार समारंभास सरपंच परिषदेचे अध्यक्ष प्रदिप (काका)माने यांसह तालुक्यातील मान्यवर उपस्थित होते.

Leave a Comment

और पढ़ें