Search
Close this search box.

गर्व न करता सर्वांशी प्रेमाने, आपुलकीने वागा : वर्षा काळे

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

प्रतिनिधी -अतुल काळे

  • सौ. रेखा राजाराम काळे बालक मंदिरामध्ये सौ रे रा काळे स्मृतीदिन संपन्न

सांगली/तासगाव : विद्यार्थ्यांनी सर्वांशी प्रेमाने व आपुलकीने वागावे. कोणत्याही गोष्टीचा गर्व करू नये असा संदेश सौ वर्षा शिरीष काळे यांनी विद्यार्थ्यांना दिला. तासगावच्या सौ रेखा राजाराम काळे बालक मंदिर मध्ये प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या.
सोमवार दिनांक 7 ऑक्टोंबर रोजी रेखा राजाराम काळे बालक मंदिरामध्ये सौ रेखा आजींचा स्मृतीदिन कार्यक्रम करण्यात आला. सौ. वर्षा काळे यांचे स्वागत, सत्कार शाळेच्या पर्यवेक्षिका पल्लवी जोशी यांच्या हस्ते करण्यात आला. प्रस्तावित पर भाषणात बोलताना श्रीयुत बल्लाळ सर म्हणाले, 1983 साली स्थापन झालेल्या या छोट्याशा रोपट्याचा आज वटवृक्ष झाला आहे. त्यासाठी काळे कुटुंबियांना धन्यवाद द्यावेत तितके थोडे आहे. आपल्या शाळेमध्ये हा उपक्रम राबवून आपण कै.सौ.काळे आजींच्या आठवणींना उजाळा देऊया.
यावेळी 2 ऑक्टोंबर गांधी जयंती भाषण स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. बक्षीस पात्र विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ नम्रता खरे यांनी केले. त्यानंतर शाळेच्या सहशिक्षिका सौ सुप्रिया जोशी यांनी उपस्थितांचे आभार मानले. सदर कार्यक्रमास शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी- विद्यार्थिनी उपस्थित होते.

Leave a Comment

और पढ़ें