Search
Close this search box.

नवी मुंबई महानगरपालिके मध्ये RTI ची माहिती देण्यासाठी अधिकारी व सुनावणी अधिकार्याचा कानाडोळा.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

लोक प्रतिनिधी धर्मेंद्र ठाकुर
नवीं मुम्बई (महाराष्ट्र)। शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे किशोर लोंढे उप विभाग प्रमुख तुर्भे विभाग नवी मुंबई यांनी सांगितले की, नवी मुंबई महानगरपालिका येथे भष्टाचार भरपूर प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे RTI नुसार माहिती लवकर मिळत नाही तसेच अपिलीय अधिकारी देखील सुनावणी नियमानुसार घेत नाहीत, तसेच तक्रारदारास माहिती न मिळता तो कसा जाईल याची वाट माहिती अधिकारी व प्रथम अपिलीय अधिकारी पाहत आहेत.
३० दिवस व वाढीव ५ दिवसांनंतर देखील माहिती अधिकारी देत नसेल तर त्याच्यावर पेनल्टी व सर्विस बुक मध्ये नोंद न करता प्रथम अपिलीय अधिकारी या गोष्टीवर कानाडोळा करत आहेत.
तरी नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तांनी या वर योग्य कारवाई व उपाय काढावा अशी मागणी होत आहे.

Leave a Comment

और पढ़ें