Search
Close this search box.

कडेगांव शहरातील अनेक संघटानांचा उपोषणाला पाठिंबा ..आमरण उपोषणाचा आजचा तिसरा दिवस .किती उपोषणे, रस्ता रोको, मोर्चा काढायचे तरीही टेंभु योजनेचे प्रशासन जागे होत नाही.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

कड़ेगांव प्रतिनिधि हेमन्त व्यास 

कडेगांव शहरातील अनेक संघटानांचा उपोषणाला पाठिंबा ..आमरण उपोषणाचा आजचा तिसरा दिवस .किती उपोषणे, रस्ता रोको, मोर्चा काढायचे तरीही टेंभु योजनेचे प्रशासन जागे होत नाही.

*मागण्या मान्य झाल्याशिवाय मेडिकल तपासणी करणार नाही .डी एस देशमुख आमरण उपोषणावर ठाम*

 

टेंभू सिंचन योजनेच्या अपुऱ्या कामांबाबत कडेगांव येथील पाणी संघर्ष समितीने 27 ऑगस्ट पासून आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. याबाबत पुणे जलसंपदा विभागाकडून पाणी संघर्ष समितीला पुणे येथे चर्चे करिता बोलावण्यात आले होते.मात्र पुण्यात या कार्यालयाकडून व उच्च अधिकाऱ्यांकडून कोणत्याही प्रकारची दखल व चर्चा न करता तुच्छ वागणूक देण्यात आली असले कसले प्रशासन आंदोलन केल्या शिवाय यांना जागच येत नाही.त्यामुळे 27 ऑगस्ट पासून कडेगांव येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात लोकांच्या व शेतकरऱ्यांच्या हक्काच्या पाण्यासाठी आमरण उपोषण सुरू करण्यात आले. पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष डी एस देशमुख आजच्या तिसरऱ्या दिवशीही आमरण उपोषणावर ठाम आहेत.
यावेळी बोलताना डी एस देशमुख म्हणाले , टेंभू योजनेचे पाणी कडेगाव व गायकवाड तलावात बंदिस्त पाईप लाईनने मिळावे व टेंभू योजनेने लेखी दिलेले आश्वासनाबाबत शासनाकडून जलद कार्यवाही व्हावी.
तसेच कडेगाव शहरातून कडेपूरला जाणार्‍या कॅनॉलला बंदिस्त पाईप लाईन टाकावी.शिवाजी नगर तलावातुन 9 नंबर पोट कालव्यातून माळवाडीला बंदिस्त पाईपलांना पाणी मिळावे.सुर्ली व कामथी आवर्तन ज्यादा शक्तीचे पंप बसवून व यांत्रिक डिझाईन करून दोन्ही आवर्तने एकाच वेळी सुरु करावीत.नेर्ली,अपशिंगे, शाळगाव,बोंबाळवाडी, कोतवडे,खंबाळे औध यासह डोंगरी भागातील गावांना टेंभू योजनेचे पाणी बंदिस्त पाईपलांनी पाणीपुरवठा व्हावा.तसेच पाणी वाटप समान करावे.कडेगाव शहरातील नागरिकांना पिण्यासाठी व खर्चासाठी उन्हाळ्यात पुरेसे व शुद्ध पाणी देणेची व्यवस्था करावी. सुर्ली व कामथी कॅनॉलचे 2020 साली निकृष्ट दर्जाचे झालेले अस्तरीकरण या भ्रस्टाचार झालेल्या कामाची चौकशी करावी यासह आदी मागण्यांबाबत 26 ऑगस्ट पर्यंत कार्यवाही व्हावी इत्यादी मागण्यासाठी 27 ऑगस्टपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. पाणी संघर्ष समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.या उपोषणाला शहरातून कडेगांव तालुका माजी सैनिक संघटनेने पांठिंबा दिला असुन रस्ता रोको करण्याचा इशाराही दिला आहे त्याचबरोबर मुस्लिम संघटना, मैत्रसंघटना, माळी समाज संघटना ,डॉक्टर व केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटना त्याचबरोबर आसपासच्या गावातील प्रमुख नागरिकांनी ही उपोषणास पाठिंबा दिलेला आहे. तरीही टेंभु योजनेचे ढंम प्रशासन जागे होईना.प्रशासनाने थोडे गांभिर्याने आमरण उपोषणाचा विचार करावा अशी नागरीकातूनही मोठी चर्चा होत आहे.टेंभु योजनेचे प्रशासन जागे होईल का व लोकांच्या हीताचे पाणी देईल का ल प्रलंबित कामे व पाणीप्रश्न एकदाच निकाली काढेल का हाच खरा प्रश्न आहे.

Leave a Comment

और पढ़ें