Search
Close this search box.

व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सिंधुदुर्ग – विवेक परब

  • शिर्डी येथे होणाऱ्या राज्य शिखर अधिवेशनाच्या लोगोचे अनावरण

जगातल्या पत्रकारांच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्रातील पत्रकारांनी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ या पत्रकारांसाठी उभ्या केलेल्या संघटनेचा आम्हाला अभिमान वाटतो. ही संघटना केवळ देशपातळीवरच नव्हे, तर विदेशातही ४३ देशांत आपल्या कामाच्या माध्यमांतून सर्वाना परिचयाची झाली आहे. व्हॉईस ऑफ मिडीयाची पाच वर्षांतील वाटचाल देदीप्यमान आणि अभिमानास्पद आहे, असे गौरवोद्गार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे काढले.
येत्या ३१ ऑगस्ट व एक सप्टेंबर असे दोन दिवस व्हॉईस ऑफ मीडियाचे राज्य शिखर अधिवेशन शिर्डी येथे आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनाच्या लोगोचे अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज झाले, त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री पुढे म्हणाले, पत्रकारांच्या आरोग्य, मुलांचे शिक्षण, घर, निवृत्ती वेतन, विमा संरक्षण व इतर अनुषंगिक सुविधांसाठी व्हॉइस ऑफ मीडिया ही संघटना लक्ष घालून पोटतिडकीने काम करीत आहे. पत्रकारांना अद्ययावत ज्ञान मिळाले पाहिजे, यासाठीही संघटनेचा कायम पुढाकार असतो. अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पत्रकारांसाठी काम करणारे संघटन म्हणून व्हॉईस ऑफ मीडियाने अल्पावधीत नावलौकिक मिळविला आहे. जगात महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांनी मिळून केलेले काम ऐतिहासिक नोद घेण्यासारखे आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
यावेळी खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार राहुल शेवाळे, खा. धनजय मंडलिक, आमदार बालाजी कल्याणकर, मुख्यमंत्री यांचे माध्यम सल्लागार विनायक पात्रुडकर, व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, राज्य कार्यअध्यक्ष योगेंद्र दोरकर, आरोग्य सेलचे प्रमुख भीमेश मुतुला, राष्ट्रीय महासचिव दिव्या भोसले , विधी विभागाचे प्रमुख संजय कल्लकोरी आदीची प्रामुख्याने उपस्थित होती.
……….
फोटो ओळ : येत्या 31 ऑगस्ट व एक सप्टेंबर असे दोन दिवस व्हॉईस ऑफ मीडियाचे राज्य शिखर अधिवेशन शिर्डी येथे आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनाच्या लोगोचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज झाले. यावेळी अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

Leave a Comment

और पढ़ें