Search
Close this search box.

निमणीत स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबीयांना ध्वजारोहणाचा मान

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

प्रतिनिधी – अतुल काळे

  • स्वातंत्र्यलढ्याच्या आठवणींना उजाळा
  • लक्ष्मण पाटील यांच्या कार्याची दखल घेतल्याने कुटुंबीयातून समाधान

सांगली/तासगाव : तासगाव तालुक्यातील निमणी येथील ग्रामपंचायती मधे 15 ऑगस्ट 2024 रोजीचे ध्वजारोहण स्वातंत्र्य सैनिक कै. लक्ष्मण बाबाजी पाटील यांची सून श्रीमती अलका महादेव पाटील यांच्या हस्ते आणि कुंबियांच्या उपस्थितीत करण्यात आले असून पाटील यांच्या पश्चात मिळालेल्या सन्मानाबद्दल कुटुंबाकडून समाधान व्यक्त होत आहे.
देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी स्वातंत्र्य सैनिक आणि शूरवीरांचा मोठा सहभाग होता. त्यामध्ये निमणी येथील स्वातंत्र्य सैनिक लक्ष्मण पाटील यांनी 1942 साली तासगाव कचेरीवरील युनियन जॅक खाली उतरवला गेला, त्या मोर्चामध्ये हिरीरीने सहभाग घेतला होता. मोर्चाचे नेतृत्व वसंतरावदादा पाटील, क्रांतिसिंह नाना पाटील यांनी केले होते. त्यादरम्यान भूमिगत असणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांना भोजन पोहोचवण्याचे काम लक्ष्मण पाटील यांनी केले होते. त्यांनी दिलेल्या योगदानाच्या स्मृतीला यावेळी उजळा देण्यात आला. ग्रामपंचायतीने स्वातंत्र्य सैनिकाच्या कुटुंबीयांना ध्वजारोहणाचा मान दिल्यामुळे कुटुंबातील सदस्यांचा उर अभिमानाने भरून आला होता.
यावेळी माजी उपसरपंच सरपंच आर. डी. पाटील यांनी उपस्थितांना विविध शासकीय योजनेची माहिती दिली. स्वातंत्र्य दिनानिमित्त ग्रामपंचायतीच्या वतीने नेत्ररोग तपासणी शिबिराचे ही आयोजन करण्यात आले होते.
या ध्वजारोहण समारंभास सरपंच सौ. रेखा रविंद्र पाटील, उपसरपंच राजेंद्र घोडके, ग्रामसेवक किरण जाधव, राजाराम कारंडे, बाळासाहेब पाटील, एम जे पाटील, विलास पाटील, मुख्याध्यापक पी. डी. गुरव, विजय पाटील, शिवाजी राजमाने, सुधीर पाटील, नवनाथ मस्के आदी मान्यवर तसेच जिल्हा परिषद शाळा, पंचक्रोशी विद्यानिकेतन आणि अंगणवाडी चे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

और पढ़ें