Search
Close this search box.

विद्यार्थ्यांनी सर्जनशील लेखन करायला शिकले पाहिजे : डॉ. गोरखनाथ किरदत

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

प्रतिनिधी – अतुल काळे

  • वसंतरावदादा पाटील महाविद्यालयात वाङ्मय मंडळ उद्घाटन

सांगली/तासगाव : वाचनाने विचाराच्या कक्षा रुंदावतात. विद्यार्थ्यांनी सर्जनशील लेखन करायला शिकले पाहिजे आणि सोशल मिडीयाच्या जमान्यात तरुणांनी वाचन संस्कृती टिकवली पाहिजे असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण कॉलेज उरुण इस्लामपूर येथील हिंदी विभागप्रमुख डॉ.गोरखनाथ किरदत यांनी केले. तासगाव येथील पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील महाविद्यालय येथे मराठी,हिंदी, इंग्रजी भाषेच्या वाङ्मय मंडळाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलता होते.
यावेळी मराठी,हिंदी, इंग्रजी विषयाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या भितीपत्रकाचे उद्घाटन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.
अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ.मिलिंद हुजरे म्हणाले लेखक आणि कवी आपल्या वाङ्मयातून समाजाला जागृत करतात विद्यार्थ्यांनी वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील राहावे. महाविद्यालयात राबविण्यात येत असलेल्या ‘मुक्त विचार मंच’, ‘वाचन कट्टा’ या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक वांङ्मय मंडळाच्या समन्वयक प्रा.वर्षा जगदाळे यांनी केले.पाहुण्यांचा परिचय डॉ. तातोबा बदामे यांनी केला तर आभार प्रा.निशाराणी देसाई यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. आण्णासाहेब बागल यांनी केले.

Leave a Comment

और पढ़ें