Search
Close this search box.

तासगाव मध्ये अंनिसच्या चित्रप्रदर्शनाचे आयोजन

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

प्रतिनिधी – अतुल काळे

सांगली /तासगाव : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या करणी या विषयावरील चित्रकला स्पर्धा नुकतीच पार पडली. महाराष्ट्रातुन असंख्य विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी सहभाग घेतला. त्यातील चित्रामधुन निवडक चित्रांचे प्रदर्शन शाळातुन घेऊन विद्यार्थ्यांना या विषयांची माहिती मिळावी या उद्देशाने हे चित्र प्रदर्शन वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित करण्यात येत आहे.
तासगाव तालुक्यातील कवठेएंकद येथील जिल्हा परिषद शाळा क्र.१ मधे दि. १३/१४ रोजी तर तासगाव शहरात मा.डी.एम. बापु विघालय नगर पालिका शाळा नं. २ येथे दि. १५/१६ रोजी आणि भारती विद्यामंदिर येथे दि. १७ तारखेला आयोजन करण्यात आले आहे. तरी विद्यार्थी, पालक आणि नागरिकांनी या चित्रप्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन अं.नि.स. तासगाव यांचे वतीने करण्यात आले आहे.

Leave a Comment

और पढ़ें