Search
Close this search box.

सावळजला स्वतंत्र पोलीस ठाणे होणार ?

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

प्रतिनिधी – अतुल काळे

  • नवीन पोलीस ठाण्यासाठी भूमी अभिलेख कडून मोजणी
  • पोलीस ठाणेबाबत सावळजकरांच्या आशा पल्लवीत
  • प्रशांत केदार यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद

सांगली/तासगाव : तासगाव तालुक्यातील सावळज येथे स्वतंत्र पोलीस ठाणे व्हावे अशी मागणी अनेक वर्ष होत होती. या मागणीच्या अनुषंगाने सावळज गाव हद्दीतील क्षेत्राची मोजणी भूमी अभिलेख कार्यालयाकडून करण्यात आली असून स्वतंत्र पोलीस ठाण्याच्या निर्मितीबाबत सावळजकरांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
तासगाव तालुक्यातील पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या सावळजला स्वतंत्र पोलीस ठाणे असावे. अशी मागणी अनेक वर्ष सुरू आहे. तासगाव तालुक्यात 69 गावांमध्ये कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी एकट्या तासगाव पोलीस ठाण्यावर आहे. जास्तीची गाव संख्या असल्यामुळे पोलिसांवर कामाचा प्रचंड ताण पडत आहे. यामुळे कायदा सुव्यवस्था राखणे कामी पोलिसांनाही अडचणी येत आहेत. तासगाव तालुक्यातील पूर्व भागातून तक्रारीसाठी तासगाव पोलीस ठाण्यात हजर राहण्यासाठी नागरिकांना जवळपास 40 किलोमीटर अंतर कापावे लागते. यामुळे वेळ आणि पैसा वाया जाऊन मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. यावर उपाय म्हणून सावळज येथे स्वतंत्र पोलीस ठाणे उभारणे गरजेचे असल्याचे महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत केदार यांनी सांगितले होते. तसेच सावळज पोलीस ठाण्याच्या मागणीसाठी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांच्या बंगल्यासमोर उपोषणाचा इशाराही त्यांनी दिला होता.
तासगावचे पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी भूमी अभिलेख कार्यालयाकडे शासकीय मोजणीची मागणी केली. त्यानुसार सावळज येथील गट नंबर 560/ब जागेची मोजणी नुकतीच पार पडली. त्यामुळे सावळजला स्वतंत्र पोलीस ठाणे मिळणार याबाबत नागरिकांच्या अशा पल्लवीत झाल्या आहेत.

Leave a Comment

और पढ़ें