Search
Close this search box.

प्राचार्य डॉ.मिलिंद हुजरे यांची श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या अर्थ सहसचिव पदी निवड

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

प्रतिनिधी – अतुल काळे

सांगली/तासगाव : “ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यांसाठी शिक्षणप्रसार” हे ब्रीदवाक्य घेऊन ज्ञान प्रसार करणाऱ्या श्री.स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या अर्थ सहसचिव पदी पद्मभूषण डॉ.वसंतरावदादा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे यांची एकमताने निवड झाली. प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे यांनी संस्थेच्या विविध शाखांत प्राध्यापक, प्राचार्य,व्यवस्थापक मंडळ सदस्य,आजीव सेवक, सांगली विभाग प्रमुख अशा विविध पदांवर संस्थेच्या ध्येय धोरणांना अनुसरून काम केले.जून २०१९ त्यांनी तासगावच्या पद्मभूषण डॉ.वसंतरावदादा पाटील महाविद्यालयाची सुत्रे हाती घेवून शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे यांच्या स्वप्नातील सर्वगुणसंपन्न विद्यार्थी घडविण्यावर त्यांनी भर दिला.काळाची पावले ओळखून नवीन इमारत, नवनवीन अभ्यासक्रम सुरू केले.अद्यावत प्रयोगशाळा तयार करून गुणवंत विद्यार्थी घडविले. त्यांच्या कामाची पोहोच म्हणून संस्थेने त्यांना आजीव सेवक, व्यवस्थापक मंडळ सदस्य आणि सांगली विभाग प्रमुख हे पद बहाल केले.आज कोल्हापूर येथे पार पडलेल्या संस्थेच्या जनरल बॉडी च्या बैठकीमध्ये प्राचार्य डॉ.मिलिंद हुजरे यांना अर्थसचिव पद देऊन गौरविण्यात आले.तर प्रशासन सहसचिव म्हणून प्राचार्य एस.एम.गवळी यांची निवड करण्यात आली.त्यांच्या निवडीबद्दल श्री.स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे,सचिवा प्राचार्य सौ.शुभांगीताई गावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांसह मित्रपरिवाराने ,प्राध्यापक गुरुदेव कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Comment

और पढ़ें