Search
Close this search box.

नवनिर्मितीचा ध्यास हीच यशाची गुरुकिल्ली : सुनील यादव

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

प्रतिनिधी – अतुल काळे

  • नाभिक समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न

सांगली/तासगाव : करिअरसंदर्भातील क्षेत्रात विविध पर्याय निर्माण झाले आहेत. आता स्पर्धेच्या काळात शिक्षणाचे क्षेत्र विस्तारलेले आहे.नवनिर्मितीचा ध्यास, स्वत: शिकण्याची जिद्द याबरोबरच चांगला कोर्स, कॉलेज निवडणे ही जीवनात यशस्वी होण्याची गुरुकिल्ली आहे. समाजाने आपल्या मुलांना उच्च शिक्षित करावे. शासनाच्या माध्यमातून विविध योजनांद्वारे शिक्षणासाठी प्रोत्साहित केले जात आहे. मुलींना इंजिनिअरिंग शिक्षण मोफत केले आहे. याचा लाभ घ्यावा असे प्रतिपादन मिरजचे सहाय्यक कोषागार अधिकारी सुनील यादव यांनी केले.
तासगाव येथील जिवा शिवा सेना प्रतिष्ठानच्या वतीने तालुक्यातील नाभिक समाजातील दहावी , बारावी तसेच स्पर्धा परीक्षेतून निवड झालेल्या यशस्वीतांचा सत्कार सोहळा प्रतिष्ठानच्या कार्यालयात पार पडला. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळकृष्ण जाधव होते. आप्पा गायकवाड उपस्थित होते.
प्रारंभी संत सेना महाराज , वीर शिवा काशीद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

स्पर्धा परीक्षे मधून नुकतीच निवड झालेले क्रीडा अधिकारी राहुल गायकवाड म्हणाले, परिस्थिती कशीही असली तरी जिद्द आणि चिकाटी आणि आत्मविश्वास ठेवल्यास यश निश्चित मिळते. मुलांना चांगली पुस्तके वाचायला द्या.
यावेळीराहुल गायकवाड ( क्रीडा अधिकारी ) , प्राची गायकवाड (महिला व बालकल्याण विभाग पर्यवेक्षिका ) , राहुल साळुंखे ( प्राथमिक शिक्षक ) ,
यांच्यासह दहावी व बारावी परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव चिन्ह व सन्मानपत्र देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे स्वागत सुमित माने यांनी केले. पाहुण्यांचा परिचय दत्तात्रय सपकाळ यांनी करून दिला. उमेश गायकवाड यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी दत्ता गायकवाड, राजू गायकवाड, अमित वास्के नंदकुमार जाधव सुभाष जाधव प्रवीण जाधव धनाजी जाधव विजय साळुंखे विजय डुबूल विठ्ठल काळे सागर गायकवाड प्रशांत गायकवाड प्रभाकर गायकवाड रोहित गायकवाड सुदाम खंडागळे सोपान गायकवाड आदी समाज बांधव उपस्थित होते.

Leave a Comment

और पढ़ें