Search
Close this search box.

स्वराज्य स्थापनेत शिवा काशिद यांचे योगदान अविस्मरणीय : सोमनाथ वाघ

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

प्रतिनिधी – अतुल काळे 

सांगली/तासगाव : तासगाव येथील संत सेना सेवा संघ व नाभिक समाजाच्या वतीने वीर शिवा काशीद यांची 364 वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्याहस्ते वीर शिवा काशीद यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी बोलताना सोमनाथ वाघ म्हणाले, किल्ले पन्हाळ गडाला सिद्दी जोहरने घातलेल्या वेढ्यातून छ. शिवाजी महाराजांना बाहेर काढण्यासाठी प्रति शिवाजी बनून शिवा काशिद यांनी स्वराज्यासाठी प्राणाचे बलिदान दिले. स्वराज्य स्थापनेत अनेक मावळ्यांनी योगदान दिले. त्यामध्ये वीर शिवा काशीद, जिवा महाले यांचे योगदान अविस्मरणीय आहे.

संत सेना मंदिर मध्ये आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पो. हे.कॉ. अभिजीत गायकवाड तर पो.हे.कॉ. सचिन कुंभार यांची प्रमुख उपस्थिती होती. स्वागत व प्रास्ताविक दत्तात्रय सपकाळ यांनी केले. संत सेना सेवा संघाचे अध्यक्ष रोहित गायकवाड यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमास प्रभाकर गायकवाड, सुदाम खंडागळे, सोपान गायकवाड, बाळासाहेब जाधव, नागेंद्र गायकवाड, विनायक गायकवाड , प्रशांत गायकवाड, सुनील गायकवाड, रमेश गायकवाड ,गोरख गायकवाड आदी समाज बांधव उपस्थित होते.

Leave a Comment

और पढ़ें