Search
Close this search box.

मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापूर येथे व्हावे : ॲड.प्रमोद पाटील.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

पुणे,अभिषेक व्यास :
मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच (खंडपीठ) कोल्हापूर येथे व्हावे अश्या स्वरूपाची आमची मागणी महाराष्ट्र शासनापर्यंत पोहोचवावी अश्या स्वरूपाचे निवेदन नायब तहसीलदार श्री कुलकर्णी यांना कडेगांव तालुका वकिल संघटने तर्फे देण्यात आले.
निवेदनात पुढे महंटले आहे की,सांगली ,सातारा, कोल्हापुर ,सोलापूर,
रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांसाठी कोल्हापूर येथे खंडपीठ व्हावे अशी मागणी गेले ३८ वर्षापासून सहा जिल्यातील वकिल,पक्षकार,सर्व सामान्य जनता करीत आहे.कोल्हापूर येथे सर्किट बेंच झाले तर मुंबई लां जाण्यासाठी लागणारा लोकांचा पैसा व वेळ वाचणार आहे.आता पर्यंत अनेक वेळा आंदोलन झालेली आहेत,इथून पुढे सुद्धा आम्ही आंदोलन ,उपोषण करणार आहे.त्यामुळे आमचे मागणीचा गांभीर्याने विचार व्हावा व आमची मागणी प्रांत अधिकारी कडेगांव आणि जिल्हाधिकारी सांगली यांचे मार्फत महाराष्ट्र शासनाकडे पाठवावी. या ६ जिल्यात ६८ तालुके असून सर्वांनी एकमुखाने खंडपीठ व्हावे अशी मागणी केली आहे.
यावेळी कडेगांव तालुका वकिल संघटना अध्यक्ष ॲड. प्रमोद पाटील, सचिव ॲड. प्रमोद पवार, ॲड. अश्रफ इनामदार, ॲड.शरद मोरे,ॲड.अमोल मोहिते, ॲड.अर्चना जगदाळे, ॲड.शरद सूर्यवंशी, ॲड.चैतन्य यादव,ॲड. जयराज माळी,ॲड. मोहसीन मुलाणी, ॲड. रिनाज नदाफ, ॲड. मनस्वी पाटील व इतर वकिल हजर होते.

Leave a Comment

और पढ़ें