Search
Close this search box.

सरस्वती स्कूल कडेपूर येथे अंतरराष्ट्रीय योग दिन साजरा 

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सांगली / हेमंत व्यास

21 जून हा’ *आंतरराष्ट्रीय योग दिन* ” या दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे आपल्या विद्यार्थ्यांच्या समवेत एक आगळावेगळा उपक्रम राबवला .
कडेपूर पंचक्रोशी मधील – तडसर ,चिंचणी ,कडेगाव ,कडेपुर ,हणमंतवडिये या गावांची निवड करून एकाच वेळी वेगवेगळ्या ग्रुपने जाऊन विद्यार्थ्यांनी’ *पथनाट्य ‘* सादर केले . या पथनाट्यातून योगाची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली . यावेळी गावातील सरपंच , इतर पदाधिकारी,ग्रामस्थ , युवा वर्ग त्याच बरोबरइतर स्कूलचे विद्यार्थी उपस्थित होते . “सुदृढ शरीर हीच खरी संपत्ती” हे पथनाट्यातून विद्यार्थ्यांनी पटवून दिले . स्वस्थ जीवन जगणं हे जीवनाचे भांडवल आहे . रोज नित्य नियमाने योग करणं ही रोगमुक्त जीवनाची खरी गुरुकुल्ली आहे . हे विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिकांमधून पटवून दिले. व योगाभ्यास करण्यासाठी प्रोत्साहित केले . अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये हा कार्यक्रम सकाळी ८ ते ९ वेळेत सादर झाला . या कार्यक्रमास पंचक्रोशीतील समस्त लोकांचे योगदान लाभले . तसेच सरस्वती स्कूलच्या आवारातही याच पद्धतीने कार्यक्रम संपन्न झाला .
यासाठी शाळेचे संस्थापक माजी आमदार. पृथ्वीराज ( बाबा ) देशमुख ,संस्थापिका सौ .वृषालीताई देशमुख ,सरस्वती ग्लोबल स्कूल च्या मुख्याध्यापिका सूर्यवंशी एस. ए .तसेच सरस्वती स्कूलच्या मुख्याध्यापिका पवार अर्चना , सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी , पालक, विद्यार्थी यांचे योगदान लाभले .

Leave a Comment

और पढ़ें