Search
Close this search box.

विद्यार्थ्यांना शाळेत एसटी पास सुविधेस प्रारंभ म.रा.प.म. चा उपक्रम

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

प्रतिनिधी – अतुल काळे

सांगली : तासगाव येथील एसटी आगार तसेच एसटी वाहतूक नियंत्रक व्यवस्थापनाने शालेय विद्यार्थ्यांना असणारे एसटी बस सवलतीचे पास प्रत्येक शाळेत जाऊन पास वितरण व्यवस्था सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती तासगाव आगारचे व्यवस्थापक दयानंद पाटील यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने यावर्षीपासून शालेय विद्यार्थ्यांसाठी शाळेतच पास देण्याची सुविधा सुरू केली आहे. शाळा व कॉलेजमधील विद्यार्थ्यांची एसटी स्टँड वर होणारी गर्दी व विद्यार्थ्यांना होणारा त्रास याची दखल घेत शाळा, कॉलेज मधेच पास उपलब्ध होतील अशी व्यवस्था होण्याबाबत महामंडळाने निर्णय घेतला आहे. शनिवार दिनांक 15 जून पासून या निर्णयाच्या अंमलबजावणीस तासगाव आगार व्यवस्थापनाने केली आहे. तासगावचे आगारप्रमुख दयानंद पाटील तसेच वाहतूक नियंत्रक शिवाजी माने यांच्या उपस्थितीत सावळज, बसतवडे परिसरातील शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना एसटी पासाचे वितरण करण्यात आले. शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला अर्ज पुरवला जाऊन शाळेतच पास व ओळखपत्र वाटप करण्यात येणार आहे. त्याचबरोबर तासगाव बस स्थानकामध्ये विद्यार्थी पास सेवा सुरूच राहणार असल्याचेही श्री. पाटील यांनी सांगितले.

Leave a Comment

और पढ़ें