Search
Close this search box.

राजुर सार्वजनिक बांधकाम विभाग व राजुर ग्रामपंचायत पिंपरकनारोड वर नागरिकांचा बळी घेतल्यावर टाकणार का स्पिडब्रेकर

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

रोहिदास लहामगे राजुर प्रतिनिधी

राजुर – महाराष्ट्र राज्यातील शाळा चालू झाल्या असुन त्या बरोबर राजुर येथील सर्वोदय विद्या मंदिर या शाळेचा एक गेट पिंपरकने रोड लगत असुन या रस्त्याचे काम नुकतेच झाले असुन हा रस्ता सिमेंट चा झाला असून वाहन चालक हे अतिवेगाने वाहन चालवतात त्यामुळे शाळेच्या गेट जवळ तीन रस्ते आल्या मुळे विद्यार्थ्यांना येणारे वाहन दिसत नाही त्यामुळे आता पर्यंत १० ते १५ विद्यार्थी व नागरिकांचे अपघात झाले त्या मध्ये कुणाचा पाय. हात. डोके. कंबर या अवयवाना मोठ्या प्रमाणात ईजाबाधा पोहचली आहे. आता बांधकाम विभाग व राजुर ग्रामपंचायत एखाद्या चा बळी घेतल्यावर स्पिडब्रेकर टाकणार का. या प्रकारा बाबत अनेकदा सार्वजनिक बांधकाम विभाग राजुर व ग्रामपंचायत राजुर यांना कळवुन सुध्दा जर स्पिड ब्रेकर टाकले जात नसतील तर येत्या ४ ते ५ दिवसात स्पिडब्रेकर टाकले नाही तर भारतीय मीडिया फाउंडेशन राजुर कमेटी च्या वतीने पिचड बंगला जवळ लवकरच तारीख ठरवुन रास्ता रोको केला जाईल याची नोंद बांधकाम विभाग व राजुर ग्रामपंचायत प्रशासनाने दखल घ्यावी.

Leave a Comment

और पढ़ें