Search
Close this search box.

संग्राम सिंह देशमुख यांनी लाडू वाटप करून नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या शपथविधी सोहळ्याचा आनंदोत्सव केला साजरा.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

कडेपूर येथे शपथविधी सोहळा लाईव्ह प्रक्षेपणचे उत्कृष्ट नियोजन.

पुण्याहुन अभिषेक व्यास

भारताचे सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा व अन्य भाजपा व मित्रपक्षांच्या ३५ मंत्र्यांचा शपथविधी सोहळा राष्ट्रपती भवन दिल्ली या ठिकाणी पार पडला. या शपथविधी सोहळ्याचे लाईव्ह प्रक्षेपण कडेपूर येथे सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व भाजपाचे पलूस कडेगाव विधानसभा प्रमुख संग्रामसिंह देशमुख यांच्या वतीने राजलक्ष्मी मल्टीपर्पज हॉल या ठिकाणी मोठ्या स्क्रीन वर भाजप कार्यकर्त्यांसोबत शपथविधी सोहळा पाहण्याचे नियोजन करण्यात आले होते. यावेळी शपथविधी सोहळ्याची हॅट्रिक सुरू होताच फटाके फोडून व विधानसभा मतदारसंघातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांना लाडू भरवून आनंदोस्तव साजरा करण्यात आला.

यावेळी कडेगांवचे नगराध्यक्षपद धनंजय देशमुख,यांच्यासह उपनगराध्यक्ष, सर्व सभापती नगरसेवक नगरसेविका, पंचायत समिती सभापती, उपसभापती, जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य, भाजपाचे सर्व बूथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख, सर्व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित.

Leave a Comment

और पढ़ें

जेवर एयरपोर्ट के द्धितीय चरण में अधिग्रहण की जा रही भूमि से प्रभावित कृषकों की समस्याओं का त्वरित गति से निस्तारण कराने के उद्देश्य से आज छेदी सिंह इंटर काॅलिज आकलपुर, म्याना जेवर में किसान चौपाल का किया गया आयोजन

जेवर एयरपोर्ट के द्धितीय चरण में अधिग्रहण की जा रही भूमि से प्रभावित कृषकों की समस्याओं का त्वरित गति से निस्तारण कराने के उद्देश्य से आज छेदी सिंह इंटर काॅलिज आकलपुर, म्याना जेवर में किसान चौपाल का किया गया आयोजन