प्रतिनिधी – अतुल काळे
भाजप कार्यकर्त्यांनी फिरवली पाठ
सांगली/तासगाव : भारताचे पंतप्रधान म्हणून सलग तिसऱ्यांदा शपथ ग्रहण केल्याचा आनंद साजरा करत शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान तासगावच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर फटाक्यांची जोरदार आतषबाजी केली.
देशातील लोकसभा निवडणूक निकाला नंतर एनडीए कडून केंद्रात सत्ता स्थापन करण्यात आली. यावेळी नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ ग्रहण केली त्याचबरोबर केंद्रीय मंत्रिमंडळाचा शपथ ग्रहण समारंभ पार पडत असतानाचा आनंद साजरा करत तासगाव शहरातील नरेंद्र मोदी समर्थकानी आपापल्या गल्लीमध्ये फटाक्यांची आतषबाजी केली. शिवतीर्थावर धारकरी एकवटत जल्लोष साजरा करण्यात आला. परंतु यावेळी भाजप कार्यकर्त्यांची अनुपस्थिती दिसून आली. शपथविधीचा आनंदोत्सव साजरा करीत असताना या आनंदोत्सवाकडे भाजप कार्यकर्त्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र दिसून आले. केंद्रात भारतीय जनता पक्षाचे नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून शपथ घेतानाचा आनंद साजरा होत असताना भाजप कार्यकर्त्यांची उपस्थिती गरजेची असल्याचे उपस्थितांत बोलले जात होते.